Om Sonawale – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Tue, 12 May 2026 15:43:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.3 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Om Sonawale – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 गाठीच्या ऑपरेशननंतर पाळीव श्वानाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप https://swabhimansatara.com/2026/swabhiman-satara-dog-news/ https://swabhimansatara.com/2026/swabhiman-satara-dog-news/#respond Tue, 12 May 2026 15:43:29 +0000 https://swabhimansatara.com/?p=947

सातारा : गोडोली नाका येथील जनावरांच्या दवाखान्यात गाठीचे ऑपरेशन केल्यानंतर उपचारातील हलगर्जीपणामुळे पाळीव श्वानाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप तक्रारदार राकेश साळुंखे यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून पाळीव प्राण्यांच्या उपचारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तक्रारदार राकेश साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या पाळीव श्वानाच्या गाठीचे ऑपरेशन गोडोली नाका येथील जनावरांच्या दवाखान्यात डॉ. चापणे यांच्याकडे करण्यात आले होते. मात्र, ऑपरेशननंतर अवघ्या तीन दिवसांत श्वानाचे टाके तुटले. त्यानंतर पुन्हा टाके घालण्यात आले, पण ते देखील दोन दिवसांत निघाल्याचा आरोप त्यांनी केला.याबाबत डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर ते स्वतः न येता त्यांच्या शिकाऊ सहकाऱ्यांना पाठवत होते. संबंधित सहकारी डॉक्टरांना फोनवर परिस्थिती सांगत होते आणि त्यानुसार औषधांचे डोस दिले जात होते. मात्र, गेल्या दहा दिवसांत योग्य डोसचे प्रमाण न समजल्यामुळे श्वानाला ओव्हरडोस झाला आणि त्याच्या किडनी निकामी झाल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे.त्यानंतर श्वानाच्या डाव्या पायाला सूज येणे, काळ्या रंगाच्या उलट्या होणे असे गंभीर प्रकार सुरू झाले. याबाबत डॉक्टरांना सांगितले असता “जखमेवरील आयोडीन चाटले असेल” असे कारण देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्यामुळे श्वानाची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.“मुका प्राणी असला तरी तोही घरातील सदस्यच असतो. आमच्या घरातील एका निरपराध जीवाचा हलगर्जीपणामुळे बळी गेला. भविष्यात इतर कुणाच्या पाळीव प्राण्याबाबत अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही हा अनुभव समोर आणत आहोत,” अशी भावना तक्रारदार राकेश साळुंखे यांनी व्यक्त केली.दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/swabhiman-satara-dog-news/feed/ 0 947
साताऱ्यात खुनाचा कट उधळला; दोघांना अटक, शस्त्रसाठा जप्त https://swabhimansatara.com/2026/satara-lcb-news/ https://swabhimansatara.com/2026/satara-lcb-news/#respond Fri, 24 Apr 2026 09:49:32 +0000 https://swabhimansatara.com/?p=944

सातारा (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील डेबेवाडी परिसरात खुनाचा कट रचणाऱ्या दोघांना एलसीबी पोलिसांनी अटक करून मोठा अनर्थ टाळला आहे. आरोपींकडून दोन पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे, एक कुर्हाड, एक सुरी तसेच मोबाईल आणि दुचाकी असा सुमारे ७ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून प्रतिस्पर्ध्याचा खून करण्याच्या उद्देशाने आरोपी डेबेवाडी येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खुनाचा कट रचल्याची कबुली दिली.

या कारवाईत एलसीबीचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्परता दाखवत आरोपींना अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पोलिस अधिक तपास करत असून फरार असलेल्या अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-lcb-news/feed/ 0 944
साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदेशाही पद्धतीने सत्कार https://swabhimansatara.com/2026/satara-shindeshahi-satara-eknathshinde/ https://swabhimansatara.com/2026/satara-shindeshahi-satara-eknathshinde/#respond Fri, 24 Apr 2026 09:26:26 +0000 https://swabhimansatara.com/?p=940

सातारा : श्रीमंत महाराजा दिल्ली दिग्विजय वीर महादजी शिंदे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य तसेच अखिल भारतीय शिंदे सरकार परिवार भारत आणि सातारा जिल्हा शिवसेना अवजड वाहतूक सेना यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री Eknath Shinde यांचा साताऱ्यात भव्य सत्कार करण्यात आला.

या वेळी शिंदेशाही परंपरेनुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांना पगडी, शाल आणि तलवार देऊन गौरविण्यात आले. या सत्कार सोहळ्याला कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विकासकामांवर भर देत राज्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरणात या कार्यक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-shindeshahi-satara-eknathshinde/feed/ 0 940
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब !” – साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ; https://swabhimansatara.com/2026/nilesh-more-shinde-sena-letter-bomb/ https://swabhimansatara.com/2026/nilesh-more-shinde-sena-letter-bomb/#respond Sun, 19 Apr 2026 12:28:53 +0000 https://swabhimansatara.com/?p=934

सातारा : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गांधी मैदानावर होणारा भव्य मेळावा अवघ्या तोंडावर आला असताना साताऱ्यात पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. शहरप्रमुख निलेश मोरे यांनी दिलेल्या राजीनाम्याने केवळ एक पद रिकामे झाले नाही, तर शहरातील शहरप्रमुख ते बूथ प्रमुखांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे संघटनाच हादरली आहे. या राजीनाम्याला “लेटर बॉम्ब” असेच संबोधावे लागेल, कारण त्यातून उघड झालेले आरोप थेट पक्षाच्या अंतर्गत कारभारावर बोट ठेवणारे आहेत.मोरे यांनी आपल्या राजीनामा पत्रातून संपर्कप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला आहे. “कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करायचे आणि श्रेय-निधी मात्र नातेवाईकांना?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विकास निधीच्या वाटपात झालेला कथित पक्षपात, नियोजन समितीतून ऐनवेळी नाव वगळणे, आणि सातत्याने डावलण्याचा आरोप — या सगळ्यामुळे स्थानिक पातळीवरील असंतोष उघडपणे समोर आला आहे.विशेष म्हणजे, हा बंडाचा सूर एखाद्या नाराज कार्यकर्त्याचा नसून कट्टर शिंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरे यांच्याकडून उमटला आहे. गोवा-गुवाहाटीच्या राजकीय घडामोडीनंतर पक्षाशी निष्ठा राखत, “शिवदूत”, “शासन आपल्या दारी”, “लाडकी बहीण” यांसारख्या योजनांपासून ते आरोग्य शिबिरे, वैद्यकीय मदत, अपंगांना व्हील चेअर वाटप, धर्मवीर चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण — अशी विविध कामे प्रामाणिकपणे राबविल्याचा दावा त्यांनी पत्रात केला आहे.साताऱ्यासारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद उभी करण्यासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांनाच जर दुय्यम वागणूक मिळत असेल, तर “निष्ठा ठेवून काय उपयोग?” असा जाहीर सवाल मोरे यांनी उपस्थित केला आहे. “आमची निष्ठा शिंदे साहेबांशी अखेरच्या श्वासापर्यंत आहे, पण पदावर काम करण्याची इच्छा उरलेली नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले आहे.मोरे यांनी स्वतःचे संपर्क कार्यालय जिल्हा संपर्क कार्यालय म्हणून चालवले, स्वतःसह कुटुंबालाही पूर्णवेळ पक्षकार्यात झोकून दिले, तरीही वरिष्ठांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. “कार्यकर्त्यांना जपण्याची ताकद नसेल, तर पक्षात राहण्याचा अर्थ नाही,” हा त्यांचा रोखठोक इशारा पक्ष नेतृत्वासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.दरम्यान, शहरातील अनेक बूथ प्रमुखांनीही पदाचे राजीनामे दिल्याने हा असंतोष वैयक्तिक न राहता संघटनात्मक बंडात परिवर्तित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरच उघडकीस आलेला हा अंतर्गत संघर्ष शिंदे गटासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/nilesh-more-shinde-sena-letter-bomb/feed/ 0 934
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ड्रीम प्रोजेक्ट पर्यटन मंत्री शंभूराज देसाई पूर्ण करणार https://swabhimansatara.com/2026/koynabackwaterfestival/ https://swabhimansatara.com/2026/koynabackwaterfestival/#respond Thu, 16 Apr 2026 16:29:22 +0000 https://swabhimansatara.com/?p=931

राज्याच्या ग्रामीण आणि नैसर्गिक पर्यटनाला नवे बळ मिळवून देणारा कोयना बॅकवॉटर महोत्सव एक मैलाचा दगड ठरेल.**कोयना बॅकवॉटर महोत्सव २०२६ : महाबळेश्वर – तापोळा – मुनावळे-कोयना बॅकवॉटर महोत्सव डिसेंबर मध्ये भव्य आयोजनाची जोरदार तयारी करा**पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश*मुंबई, दि. 16 एप्रिल : सातारा जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीने ‘कोयना बॅकवॉटर महोत्सव २०२६’ हा एक मैलाचा दगड ठरणार असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि नैसर्गिक पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. राज्यातील पर्यटनाला नवे परिमाण देण्यासाठी आणि सातारा जिल्ह्यातील कोयना बॅकवॉटर परिसराचे अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य जगभर पोहोचवण्यासाठी कोयना तापोळा मुनावळे बॅकवॉटर महोत्सव २०२६ भव्य स्वरूपात येत्या डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनाबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि सहसंचालक संतोष जाधव यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत महोत्सवाचे स्वरूप, नियोजन आणि विविध आकर्षणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महोत्सव महाबळेश्वर – तापोळा – मुनावळे या निसर्गरम्य परिसरात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचा सरकारचा मानस आहे.मंत्री देसाई यांनी सांगितले की, “कोयना बॅकवॉटर परिसराला जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सूचनांनुसार महोत्सवाचे नियोजन अत्यंत भव्य आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात येईल.” राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सातारा जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे सुधारित रस्ते आणि सुविधा यामुळे पर्यटकांचा प्रवास अधिक सुलभ व सुखकर होणार आहे. तापोळा मुनावळे महाबळेश्वर हे पर्यटनदृष्टीने जगभरात प्रोजेक्ट करणे हे उपमुख्यमंत्री शिंदे महोदय यांचे स्वप्न आहे आणि पर्यटन मंत्री देसाई यांनी त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत.या महोत्सवात पर्यटकांसाठी विविध आकर्षक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स), हेलिकॉप्टर राईड, बग्गी राईड, ड्रोन शो, हाऊसबोट, फ्लोटिंग मार्केट, टेंट सिटी, खाद्य जत्रा, हेरिटेज वॉक विथ राईड , मॉर्निंग योगा, किल्ले व शस्त्र प्रदर्शन, तसेच बालमेळा यांसारख्या उपक्रमांचा समावेश असेल. संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघणार असून पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देण्यात येणार आहे.शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शालेय सुट्ट्यांच्या कालावधीत महोत्सव आयोजित करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यटन, संस्कृती आणि साहसी उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल. तसेच तापोळा परिसरात महोत्सवासाठी योग्य स्थळ निश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले आहेत. महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी व्यापक प्रसिद्धी मोहीम राबविण्यावरही भर देण्याच्या सूचना पर्यटन विभागाला दिल्या आहेत.

]]>
https://swabhimansatara.com/2026/koynabackwaterfestival/feed/ 0 931
तासवडे एमआयडीसी, कराड येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. https://swabhimansatara.com/2026/taswde_midc-karad_chemical-company-explosion/ https://swabhimansatara.com/2026/taswde_midc-karad_chemical-company-explosion/#respond Tue, 31 Mar 2026 06:21:21 +0000 https://swabhimansatara.com/?p=928

तासवडे एमआयडीसी, कराड येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. एस.के.एस. केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन संपूर्ण परिसर हादरून गेला.सकाळी साडेआठच्या सुमारास पहिला जोरदार स्फोट झाला. त्यानंतर अल्पावधीतच आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झाले. या स्फोटांचा आवाज तब्बल १० किलोमीटर परिसरात ऐकू आला, ज्यामुळे ग्रामस्थांच्या कानठळ्या बसल्या.

प्राथमिक माहितीनुसार, कंपनीतील बॉयलर किंवा रिअॅक्टरचा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोट इतका भीषण होता की, रिअॅक्टरचे झाकण तब्बल १०० मीटर दूर जाऊन पडले.

या स्फोटांनंतर कंपनीत भीषण आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाला तब्बल ५० ते ५५ फूट उंच उसळताना दिसत होत्या. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री कारखाना, कराड नगरपालिका आणि जयवंत शुगर कारखान्याचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, स्फोटाचा परिणाम परिसरातील गावांवरही झाला आहे. तासवडे, वराडे, वहागाव, तळबीड आणि घोणशी या गावांसह १० किलोमीटर परिसरातील घरांना तडे गेले असून, अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

मात्र, सुदैवाची बाब म्हणजे ही घटना कंपनी बंद असताना घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/taswde_midc-karad_chemical-company-explosion/feed/ 0 928
एसपी तुषार दोशी सक्तीच्या रजेवर… राजकारण तापलं ! सातारा जिल्हा परिषद निवडणूक वाद चिघळला… https://swabhimansatara.com/2026/sp-tushar-doshi_forced-leave-for-zp-election-argument/ https://swabhimansatara.com/2026/sp-tushar-doshi_forced-leave-for-zp-election-argument/#respond Mon, 30 Mar 2026 06:09:24 +0000 https://swabhimansatara.com/?p=923

सातारा जिल्हा परिषद निवडणूक वाद चिघळला… एस.पी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर… राजकारण तापलं!
साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळ प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी पोलिसांकडून मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर देसाई यांनी थेट विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणात शिवसेना आणि इतर आमदारांनी एस.पी तुषार दोषी यांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने चौकशी पूर्ण होईपर्यंत दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे पोलीस अधीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या निवडणुकीदरम्यान राजकीय घडामोडींनाही वेग आला होता. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही सदस्यांना आपल्या बाजूला वळवल्याचा आरोप करण्यात आला. तसेच राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदानापासून रोखण्यासाठी पोलिसांनी अटक केल्याचा मुद्दाही वादग्रस्त ठरला.

“एसपी घरगड्यासारखे वागले… त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे,” अशी जोरदार मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली होती.
दरम्यान, ४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत. त्याआधीच झालेल्या या कारवाईमुळे साताऱ्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/sp-tushar-doshi_forced-leave-for-zp-election-argument/feed/ 0 923
सातारा प्रकरणाने राज्य हादरलं ! ७५० ग्रॅम बाळाचा मृत्यू… जबाबदार कोण ? https://swabhimansatara.com/2026/satara-civil-hospital-750gm-baby-for-expired-case-in-highcourt/ https://swabhimansatara.com/2026/satara-civil-hospital-750gm-baby-for-expired-case-in-highcourt/#respond Sun, 29 Mar 2026 06:54:14 +0000 https://swabhimansatara.com/?p=919

सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शनिवारी दिवसभर आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात तळ ठोकून सखोल चौकशी केली.

विजापूर, कर्नाटक येथील अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याने सुरुवातीला गर्भपातास कायदेशीर अडचणी आल्या. मात्र, नंतर मेडिकल बोर्डाच्या परवानगीनंतर सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्यामुळे प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चाँदसाहेब शिकलगार यांनी प्रसूती केली. मात्र, अकाली प्रसूती झाल्यामुळे बाळाचे वजन केवळ ७५० ग्रॅम होते.

याच दरम्यान, बाळाला १२ तास उपाशी ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला असून, योग्य वैद्यकीय काळजी न मिळाल्यानेच अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

🟣 चौकशी अपडेट :
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीत आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत.

शनिवारी दुपारी दोन वाजता ही समिती सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल झाली.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, डॉ. चाँदसाहेब शिकलगार यांच्यासह संबंधित सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची तब्बल अनेक तास कसून चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान सर्वांचे मोबाईल बंद ठेवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी महिला व बालविकास विभागामार्फत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवार, २ एप्रिल रोजी होणार असून, त्यावेळी चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.या घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यातील महिला संघटनांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना घेराव घातला असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
या संपूर्ण प्रकरणात नेमकी चूक कुणाची? जबाबदारांवर कारवाई होणार का?
याचे उत्तर आता २ एप्रिलच्या सुनावणीत स्पष्ट होणार आहे……..

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-civil-hospital-750gm-baby-for-expired-case-in-highcourt/feed/ 0 919
आजपासुन IPL महासंग्राम सुरू ! पहिल्याच सामन्यात मोठा थरार…RCB vs SRH https://swabhimansatara.com/2026/ipl-starts-from-todays-2026/ https://swabhimansatara.com/2026/ipl-starts-from-todays-2026/#respond Sat, 28 Mar 2026 05:46:11 +0000 https://swabhimansatara.com/?p=915

आयपीएल २०२६ चा बहुप्रतिक्षित महासंग्राम आज, शनिवार (दि. २८) पासून रंगणार आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू अर्थात आरसीबी आपल्या विजेतेपदाच्या बचावासाठी सज्ज झाली आहे. उद्घाटनाच्या सामन्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा सामना सनरायजर्स हैदराबाद या तगड्या संघाशी होणार आहे.

या हायव्होल्टेज सामन्यात सर्वांच्या नजरा असतील त्या विराट कोहलीच्या खेळीवर. कोहलीसोबत फिल सॉल्ट डावाची सुरुवात करेल, अशी शक्यता आहे. जेकब बेथेलच्या फॉर्मकडेही लक्ष असेल, तर देवदत्त पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. कर्णधार रजत पाटीदार चौथ्या क्रमांकावर संघाची धुरा सांभाळेल.

यष्टिरक्षक म्हणून जितेश शर्मा संघात असेल. टीम डेव्हिड आणि रोमारिओ शेफर्ड यांच्यासारखे स्फोटक फलंदाजही अंतिम संघात स्थान मिळवू शकतात. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारवर मोठी जबाबदारी असेल, तर मंगेश यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबादकडेही तगडी फलंदाजी फळी आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा सलामीला येतील, तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि नितीश रेड्डी मधल्या फळीत मजबुती देतील.

गोलंदाजीत जयदेव उनाडकट आणि हर्षल पटेल वेगवान आघाडी सांभाळतील, तर झिशान अन्सारी फिरकीची जबाबदारी पार पाडेल. एकूणच, IPL 2026 चा हा पहिला सामना रोमांचक होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस म्हणजे उत्सवच !

]]>
https://swabhimansatara.com/2026/ipl-starts-from-todays-2026/feed/ 0 915
शिंगणापूर यात्रा २०२६ शिवपार्वती विवाहसोहळा धुमधडाक्यात…… https://swabhimansatara.com/2026/shingnapuryatra2026/ https://swabhimansatara.com/2026/shingnapuryatra2026/#respond Fri, 27 Mar 2026 10:32:08 +0000 https://swabhimansatara.com/?p=912

सातारा जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर यात्रेत गुरुवारी भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळाला. मानाच्या पागोटे बांधण्याचा सोहळा आणि मध्यरात्री पार पडलेला शिवपार्वती विवाहसोहळा यामुळे संपूर्ण शिंगणापूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.

चैत्र शुद्ध अष्टमीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिंगणापूर यात्रेत मानाच्या पागोटे म्हणजेच ध्वज बांधण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दुपारपासूनच मानाच्या पागोट्यांचे शहरात आगमन झाले. पोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि हरहर महादेवच्या जयघोषात ही पागोटी शंभू महादेव मंदिरात आणण्यात आली. मंदिरात विधिवत पूजन केल्यानंतर, कोळी समाज बांधवांनी अत्यंत साहसाने आणि परिश्रमाने शंभू महादेव मंदिर ते अमृतेश्वर मंदिराच्या कळसापर्यंत मानाचे ध्वज बांधले.जवळपास दीड तास चाललेल्या या सोहळ्यावेळी लाखो भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि जयघोषात सहभाग घेतला.

दरम्यान, मध्यरात्री बारा वाजता पारंपरिक पद्धतीने शिवपार्वती विवाहसोहळा संपन्न झाला. सनई, चौघडा, ढोल-ताशांच्या मंगलमय सुरात, विष्णू-लक्ष्मीच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.
गुलाबी रंगाची उधळण, ज्वारीच्या अक्षता आणि मंगलाष्टकांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

फटाक्यांच्या आतषबाजीत आणि हरहर महादेवच्या जयघोषात लाखो भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. यात्रेनिमित्त पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस उपअधीक्षक रणजीत सावंत आणि सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, २९ आणि ३० मार्च हे यात्रेचे मुख्य दिवस असल्याने शिंगणापूर नगरीत भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण परिसर सध्या भक्तीमय वातावरणात फुलून गेला आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/shingnapuryatra2026/feed/ 0 912