#750grambaby – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Sun, 29 Mar 2026 06:54:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #750grambaby – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 सातारा प्रकरणाने राज्य हादरलं ! ७५० ग्रॅम बाळाचा मृत्यू… जबाबदार कोण ? https://swabhimansatara.com/2026/satara-civil-hospital-750gm-baby-for-expired-case-in-highcourt/ https://swabhimansatara.com/2026/satara-civil-hospital-750gm-baby-for-expired-case-in-highcourt/#respond Sun, 29 Mar 2026 06:54:14 +0000 https://swabhimansatara.com/?p=919

सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शनिवारी दिवसभर आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात तळ ठोकून सखोल चौकशी केली.

विजापूर, कर्नाटक येथील अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याने सुरुवातीला गर्भपातास कायदेशीर अडचणी आल्या. मात्र, नंतर मेडिकल बोर्डाच्या परवानगीनंतर सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्यामुळे प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चाँदसाहेब शिकलगार यांनी प्रसूती केली. मात्र, अकाली प्रसूती झाल्यामुळे बाळाचे वजन केवळ ७५० ग्रॅम होते.

याच दरम्यान, बाळाला १२ तास उपाशी ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला असून, योग्य वैद्यकीय काळजी न मिळाल्यानेच अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

🟣 चौकशी अपडेट :
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीत आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत.

शनिवारी दुपारी दोन वाजता ही समिती सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल झाली.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, डॉ. चाँदसाहेब शिकलगार यांच्यासह संबंधित सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची तब्बल अनेक तास कसून चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान सर्वांचे मोबाईल बंद ठेवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी महिला व बालविकास विभागामार्फत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवार, २ एप्रिल रोजी होणार असून, त्यावेळी चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.या घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यातील महिला संघटनांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना घेराव घातला असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
या संपूर्ण प्रकरणात नेमकी चूक कुणाची? जबाबदारांवर कारवाई होणार का?
याचे उत्तर आता २ एप्रिलच्या सुनावणीत स्पष्ट होणार आहे……..

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-civil-hospital-750gm-baby-for-expired-case-in-highcourt/feed/ 0 919