#Aanmbneli – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Fri, 13 Mar 2026 10:21:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #Aanmbneli – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 आंबेनळी घाट वॅग्नर कार चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळली… https://swabhimansatara.com/2026/aanmbneli-ghat-car-accident-300-400-foot-valley/ https://swabhimansatara.com/2026/aanmbneli-ghat-car-accident-300-400-foot-valley/#respond Fri, 13 Mar 2026 10:20:45 +0000 https://swabhimansatara.com/?p=826

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावली टोक–चिरेखिंड परिसरात गुरुवारी पहाटे हा भीषण अपघात घडला. मुंबईहून लाखवड येथे आपल्या गावी परत येत असताना वॅग्नर कार चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळली. घाटातील हा भाग अत्यंत धोकादायक असल्यामुळे वाहन खोल दरीत अडकून पडले.

या अपघातात अजय सुनील संकपाळ, तुकाराम संकपाळ, सुनील संकपाळ, पार्थ संकपाळ आणि संगीता संकपाळ हे पाच जण जखमी झाले आहेत. हे सर्व जण लाखवड गावचे असून मुंबईहून आपल्या गावी परतत होते.रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात झाला. मुंबईहून गावी परतणाऱ्या कुटुंबाची कार सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळल्याने पाच जण जखमी झाले. स्थानिक बचाव पथक आणि ग्रामस्थांच्या मदतीने थरारक बचावकार्य राबवण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य संकेत सावंत आणि ऋषिकेश जाधव यांनी तातडीने टीमला सतर्क केले. त्यानंतर अजित जाधव, अनिकेत वागदरे, संकेत सावंत आणि ऋषिकेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलादपूर पोलिसांनीही या बचाव मोहिमेत सहभाग घेतला. अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत रेस्क्यू टीमने शोधमोहीम राबवत जखमींना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, आंबेनळी घाटातील धोकादायक वळणांमुळे वारंवार अपघात घडत असल्याने या मार्गावर अधिक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/aanmbneli-ghat-car-accident-300-400-foot-valley/feed/ 0 826