#BhajiMandai – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Thu, 26 Mar 2026 06:46:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #BhajiMandai – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 मलकापूर शहरात भरधाव मोटारीने भाजी मंडईत घुसून चार महिलांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर…… https://swabhimansatara.com/2026/malakapur-bike-accident-for-vegetable-market/ https://swabhimansatara.com/2026/malakapur-bike-accident-for-vegetable-market/#respond Thu, 26 Mar 2026 06:46:44 +0000 https://swabhimansatara.com/?p=898

मलकापूर शहरात एक भीषण अपघात घडला असून, भरधाव मोटारीने भाजी मंडईत घुसून चार महिलांना तसेच चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, तिघींवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोयना वसाहत परिसरात सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. महामार्गाच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी मोटार अचानक नियंत्रण सुटून भाजी मंडईत घुसली. या मोटारीने प्रथम एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर भाजी विकत बसलेल्या महिलांना चिरडत पुढे जाऊन रस्त्यालगतच्या कठड्यावर आदळून अडकली.

या भीषण अपघातात उषा बाळू रौंदाळे (वय ४७, रा. मलकापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रूपाली मारुती पाटील (वय ३७, रा. काले), दीपाली सचिन हुलवान (वय ३८) आणि ज्ञानदा सचिन हुलवान (वय १३) या तिघी जखमी झाल्या असून त्यांच्यावर येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, ही मोटार एका महिलेकडून चालवली जात असल्याची माहिती तेथील रहिवासी लोंकाकांकडून दिली जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.या घटनेने मलकापूर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/malakapur-bike-accident-for-vegetable-market/feed/ 0 898