#Bhajp – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Fri, 20 Mar 2026 08:54:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #Bhajp – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 साताऱ्यात सत्ता संघर्ष पेटला ! राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र, भाजपवर दबावाचा आरोप…. https://swabhimansatara.com/2026/satara-zp-power-struggles-bjp-is-pressure-for-rashtrawadi-shivsena/ https://swabhimansatara.com/2026/satara-zp-power-struggles-bjp-is-pressure-for-rashtrawadi-shivsena/#respond Fri, 20 Mar 2026 08:54:10 +0000 https://swabhimansatara.com/?p=870

साताऱ्यात सत्तासंघर्ष पेटला ! राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपवर दबाव टाकल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र भाजपकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेना – राष्ट्रवादीने आता नवा पर्याय स्वीकारला आहे.
आता राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे साताऱ्यात नव्या राजकीय युतीची चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केले :-

भाजप आमच्या सदस्यांवर दबाव टाकत असून दोन सदस्यांना आपल्या गोटात ओढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच काही सदस्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या सर्व घडामोडींमुळे साताऱ्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी काळात सत्तासमीकरण आणखी बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-zp-power-struggles-bjp-is-pressure-for-rashtrawadi-shivsena/feed/ 0 870
साताऱ्यात भाजपचे ऑपरेशन लोटस….शिवसेना राष्ट्रवादी एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार.. -मंत्री शंभूराज देसाई. https://swabhimansatara.com/2026/satara-zp-election-president-vice-president-strugle/ https://swabhimansatara.com/2026/satara-zp-election-president-vice-president-strugle/#respond Fri, 20 Mar 2026 08:23:57 +0000 https://swabhimansatara.com/?p=863

साताऱ्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ची रणनीती आखल्याची चर्चा रंगली आहे.

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे या जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी भाजपकडून अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय राजू भोसले उपाध्यक्ष पदासाठी मैदानात उतरले आहेत.

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपला सत्तेबाहेर ठेवत एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

मात्र, भाजपने ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून या समीकरणाला धक्का देण्याची जोरदार तयारी केल्याचं चित्र दिसत आहे.

या सगळ्या राजकीय हालचालींवर – मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊनच ही निवडणूक लढवणार आहेत. आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहोत आणि विजय आमचाच होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

साताऱ्यातील या सत्तासंघर्षामुळे पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-zp-election-president-vice-president-strugle/feed/ 0 863
पाटणकर गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश : मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश… https://swabhimansatara.com/2025/pathanshambhurajdesaishivsenapravesh/ https://swabhimansatara.com/2025/pathanshambhurajdesaishivsenapravesh/#respond Mon, 29 Dec 2025 07:17:31 +0000 https://swabhimansatara.com/?p=701

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तोंडावर भाजपच्या पाटणकर गटातील सरपंच संघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह पदाधिकारी सरपंच,उपसरपंच आणि 400 कार्यकर्त्यांचा शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत तसेच, भाजपचे सत्यजित पाटणकर यांच्या गटाला मोठा धक्का, पाटणकर गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठे पक्षप्रवेश शिवसेनेत होत आहेत. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील सरपंच संघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह भाजपच्या पाटणकरांचे सरपंच, उपसरपंच पदाधिकारी 400 कार्यकर्त्यांसह त्यामध्ये महिला कार्यकर्त्या सुद्धा उपस्थितीत होत्या. यावेळी मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पाटण ढेबेवाडी येथे कार्यकर्ते संवाद मेळावा घेण्यात आला.

यावेळी मंत्री शंभूराज देसाई बोलताना म्हणाले की,

“भाजपमध्ये गेलेल्या पाटणकरांच्या कार्यपद्धतीला कंटाळून व शिवसेनेकडून सुरू असलेल्या विकासकामाने प्रभावित होऊन शेकडोंच्या संख्येत कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत.”

या पक्षप्रवेशामुळे पाटण तालुक्यातील आगामी निवडणुकीमध्ये निर्णायक ताकद आपणास मिळेल तसेच, शिवसेनेचा ग्रामीण भागातील प्रभाव अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2025/pathanshambhurajdesaishivsenapravesh/feed/ 0 701
साताराजिल्ह्यात कमळाची लाट : १० पैकी ७ नगरपालिका-नगरपंचायतींवर भाजपचा दणदणीत विजय 🚩सातारा, वाई, फलटण, मलकापूर, म्हसवड, रहिमतपूर, मेढा — भाजप सुसाट! https://swabhimansatara.com/2025/sataranagarpalikaelection2025/ https://swabhimansatara.com/2025/sataranagarpalikaelection2025/#respond Mon, 22 Dec 2025 07:25:57 +0000 https://swabhimansatara.com/?p=630

सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा उलथापालथ करणारा निकाल आज समोर आला आहे.
१० पैकी ७ नगरपालिका आणि नगरपंचायतींवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
शहरी मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिला असून, महाविकास आघाडीला जबर धक्का बसला आहे.

नगरपालिका निवडणुकांमुळे सातारा जिल्ह्यातील वातावरण गेल्या महिनाभरापासून तापलेलं होतं.रविवारी ९ नगरपालिका आणि १ नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला आणि निकालात स्पष्टपणे “कमळाची लाट” दिसून आली.

भाजप – ७ पालिका
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – २
स्थानिक आघाडी – १

सातारा, वाई, फलटण, मलकापूर, म्हसवड, रहिमतपूर आणि मेढा नगरपंचायत…
या सात ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपद जिंकत सत्ता काबीज केली.तर महाबळेश्वर आणि पाचगणीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला यश मिळालं.कराडमध्ये मात्र लोकशाही विकास आघाडी आणि यशवंत विकास आघाडीने भाजपचा रथ रोखला.

साताऱ्यातील लढत विशेष लक्षवेधी ठरली.ना. शिवेंद्रराजे भोसले आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या मनोमीलनानंतर
भाजपचे अमोल मोहिते यांनी विक्रमी विजय मिळवला.४२ हजार ३२ मतांनी विजय — राज्यात नंबर १ मताधिक्य! भाजपला ४१ जागा मिळाल्या, मात्र ९ अपक्षांनी राजेंच्या बालेकिल्ल्यात ऐतिहासिक मुसंडी मारली.फलटणमध्ये तब्बल ३० वर्षांची रामराजेंची सत्ता कोसळली. भाजपचे समशेरसिंह निंबाळकर यांनी ६०० मतांनी बाजी मारली.कराडमध्ये मात्र भाजपला मोठा धक्का बसला.लोकशाही विकास आघाडीचे राजेंद्रसिंह यादव यांनी भाजपचे विनायक पावसकर यांचा सुमारे ९,७३५ मतांनी पराभव केला.

✔ म्हसवड – जयकुमार गोरे यांचा करिष्मा, भाजपचा व्हाईट वॉश
✔ वाई – मकरंद पाटील यांना धक्का, भाजपचे अनिल सावंत विजयी
✔ रहिमतपूर – २५ वर्षांनंतर सत्तांतर, भाजपच्या वैशाली माने विजयी
✔ मलकापूर – डॉ. अतुल भोसले यांची जादू, भाजपचा दणदणीत विजय
✔ मेढा – शिवेंद्रराजेंची पकड कायम, भाजपचा भगवा

अमोल मोहिते | नगराध्यक्ष, सातारा (भाजप)
“सातारकरांनी विकासाला मत दिलं. हा विजय जनतेचा आहे.”

एकूणच, साताराजिल्ह्यात भाजपचं वर्चस्व अधोरेखित झालं आहे.
शहरी भागात भाजपला मिळालेला कौल
आगामी राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2025/sataranagarpalikaelection2025/feed/ 0 630