#BJP – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Tue, 17 Mar 2026 12:20:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #BJP – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 कराड पंचायत समिती इतिहासात पहिल्यांदाच भाजपने सत्ता काबीज करत केला नवा अध्याय…… https://swabhimansatara.com/2026/karad-panchyat-samiti-first-time-history-in-bjp-2026/ https://swabhimansatara.com/2026/karad-panchyat-samiti-first-time-history-in-bjp-2026/#respond Tue, 17 Mar 2026 12:19:58 +0000 https://swabhimansatara.com/?p=859

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने सत्ता काबीज करत नवा अध्याय लिहिला आहे.

पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांवर भाजपच्या महिलांची निवड झाली आहे. आमदार डॉ. अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांच्या रणनीतीमुळे हे ऐतिहासिक सत्तांतर शक्य झाले आहे. भाजपच्या एकाही मतात फूट पडू नये यासाठी पक्षनेत्यांनी काटेकोर नियोजन केले आणि विरोधकांचा प्रभावी राजकीय ‘गेम प्लॅन’ उधळून लावला.

“भाजपचा कराड पंचायत समितीवर पहिल्यांदाच झेंडा”—-
“महिलांच्या नेतृत्वाला प्राधान्य”

निवडणुकीत कराड दक्षिणमधील विंग गणातील नंदाताई यादव यांची सभापतीपदी, तर कराड उत्तरमधील वाघेरी गणातील अनिता वेताळ यांची उपसभापतीपदी निवड झाली. या निवडीमुळे तालुक्यातील स्थानिक राजकारणात मोठा टप्पा गाठला गेला आहे.कराड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपने दमदार कामगिरी केली आहे.

१२ जिल्हा परिषद गटांपैकी ८ गटांमध्ये आणि २४ पंचायत समिती गणांपैकी १३ गणांमध्ये विजय मिळवत भाजपने स्पष्ट बहुमताचा कौल मिळवला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४, शरद पवार गटाला ३, काँग्रेसला २ आणि शिवसेना शिंदे गटाला २ जागा मिळाल्या.

📊 “भाजप – १३ / राष्ट्रवादी (अजित) – ४ / राष्ट्रवादी (शरद) – ३ / काँग्रेस – २ / शिवसेना – २”

या ऐतिहासिक विजयामुळे पंचायत समितीवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी आता खरी कसोटी कामगिरीची असणार आहे.सत्तेसोबतच जबाबदारीही वाढली आहे.

गावपातळीवरील पायाभूत सुविधा, शेतीविकास, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काम करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हे भाजपसमोरील मोठे आव्हान असेल. निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करत विकासकामांना गती देणे आवश्यक ठरणार आहे.ऐतिहासिक सत्तांतराचा आनंद एकीकडे असला, तरी दुसरीकडे जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी पंचायत समितीमार्फत प्रभावी आणि विधायक कामगिरी करणे हीच नव्या नेतृत्वाची खरी परीक्षा असणार आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/karad-panchyat-samiti-first-time-history-in-bjp-2026/feed/ 0 859