#Crime – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Sun, 15 Mar 2026 12:25:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #Crime – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर……. https://swabhimansatara.com/2026/satara-maan-taluka-for-crime-registration/ https://swabhimansatara.com/2026/satara-maan-taluka-for-crime-registration/#respond Sun, 15 Mar 2026 12:25:46 +0000 https://swabhimansatara.com/?p=844

पळशी गावात केवळ ५० रुपये चोरल्याच्या संशयावरून एका १३ वर्षीय मुलाला लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत मुलाच्या हाताला आणि नाकाला फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माण तालुक्यातील पळशी गावात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मार्च २०२६ रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास १३ वर्षीय मुलगा मित्रांसोबत रंगपंचमी खेळत होता. त्याच वेळी गावातील रोहित सुभाष लोखंडे याने त्या मुलाला आपल्या दुकानाजवळ बोलावून घेतले.
रोहित लोखंडे याने मुलाला दुकानाच्या गल्ल्यातून ५० रुपये घेऊन ये असे सांगितले. मुलगा गल्ल्यातून पैसे काढत असताना आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर “तू आमच्या दुकानातून पैसे चोरत आहेस” असा आरोप करत त्याला दुकानाबाहेर ओढून नेले.

यानंतर आरोपीने त्या मुलाला लाकडी काठीने दोन्ही पायांवर, पाठीवर आणि हातावर बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे मुलगा बेशुद्ध पडला. ही माहिती मिळताच त्याचे वडील सचिन श्रीरंग करडे यांनी मुलाला तातडीने म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सातारा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलाच्या डाव्या हाताच्या दंडाला आणि नाकाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान शुद्धीवर आल्यानंतर मुलाने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर ११ मार्च रोजी सचिन करडे यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रोहित सुभाष लोखंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-maan-taluka-for-crime-registration/feed/ 0 844
साताऱ्याच्या कराडजवळ घडली रात्री थरारक घटना ; उंब्रज पोलिसांनी 5 तासांत पकडला ! https://swabhimansatara.com/2025/sataraumbrajpolicecrime/ https://swabhimansatara.com/2025/sataraumbrajpolicecrime/#respond Thu, 25 Dec 2025 12:48:05 +0000 https://swabhimansatara.com/?p=670

साताऱ्याच्या कराडजवळ घडली रात्री थरारक घटना …अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताने पोलिसांना चकवा देत हातातील बेड्यांसह पळ काढला.

उंब्रज पोलिसांच्या ताब्यातून अत्याचारातील पळालेला आरोपी उंब्रज पोलिसांनी 5 तासांत पकडला. हातातील बेडयांसह आरोपीने ऊसाच्या शेतातून ठोकली होती. धूम पुणे येथे पहाटे 3 वाजता पोलिसांनी पकडला आरोपी उंब्रज पोलिसांच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर पोलीस गाडीतून खाली उतरल्याच्या संधीचा फायदा घेत आरोपी झाला होता.

आरोपीला कराड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुण्यातून घेतले ताब्यात आरोपीला उंब्रज पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

पसार आरोपीचे नाव :- अनिकेत प्रकाश लोहार

]]>
https://swabhimansatara.com/2025/sataraumbrajpolicecrime/feed/ 0 670