#Election – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Sat, 20 Dec 2025 06:47:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #Election – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 सातारा नगरपालिका मतमोजणी : उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट,साताऱ्याची सत्ता कुणाच्या हातात? https://swabhimansatara.com/2025/satara-election-nagarpalaika/ https://swabhimansatara.com/2025/satara-election-nagarpalaika/#respond Sat, 20 Dec 2025 06:47:02 +0000 https://swabhimansatara.com/?p=618

सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर उद्या रविवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी एमआयडीसीतील डीएमओ गोडावून येथील मतमोजणी केंद्रावर सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बारकूल यांनी मतमोजणी प्रक्रियेचे सविस्तर आणि सूक्ष्म नियोजन केले आहे.
एकूण १६ टेबलवर मतमोजणी होणार असून, १० फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवकपदासाठी १६९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. साताऱ्यातील एकूण मतदारसंख्या १ लाख ४८ हजार ३०७ इतकी असून, त्यापैकी ८६ हजार ८१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सुमारे ५८.५४ टक्के मतदान झाले आहे. मतदानानंतर सर्व मतदान यंत्रे एमआयडीसीतील डीएमओ गोडावून येथील स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून, या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे.
प्रत्येक आठ तासाला अधिकाऱ्यांकडून तपासणी करून त्याचा अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केला जात आहे.मतमोजणीसाठी सुमारे १५० पर्यवेक्षक व कर्मचारी नेमण्यात आले असून, त्यांना तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले आहे.तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे २०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

मतमोजणीची प्रक्रिया सकाळी ९.३० ते १० दरम्यान सुरू होण्याची शक्यता असून,प्रभाग क्रमांक १ ते ३ ची मतमोजणी सर्वप्रथम होणार आहे.नियोजनानुसार दुपारी १२ वाजेपर्यंत साताऱ्यातील निकालाचे चित्र स्पष्ट होईल, तर दुपारी १ ते १.३० दरम्यान संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

सातारा पालिकेच्या मतमोजणीस प्रशासन सज्ज
▶ उद्या सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणी
▶ १६ टेबल, १० फेऱ्यांत मोजणी
▶ दुपारी १२ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट
▶ दुपारी १ ते १.३० दरम्यान संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता
▶ एमआयडीसीतील डीएमओ गोडावून येथे मतमोजणी
▶ २०० पोलिसांचा कडक बंदोबस्त

– आशिष बारकूल,
निवडणूक निर्णय अधिकारी, सातारा

“मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. नागरिक व उमेदवारांनी सहकार्य करावे.”

]]>
https://swabhimansatara.com/2025/satara-election-nagarpalaika/feed/ 0 618