#forcedleave – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Mon, 30 Mar 2026 06:09:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.3 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #forcedleave – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 एसपी तुषार दोशी सक्तीच्या रजेवर… राजकारण तापलं ! सातारा जिल्हा परिषद निवडणूक वाद चिघळला… https://swabhimansatara.com/2026/sp-tushar-doshi_forced-leave-for-zp-election-argument/ https://swabhimansatara.com/2026/sp-tushar-doshi_forced-leave-for-zp-election-argument/#respond Mon, 30 Mar 2026 06:09:24 +0000 https://swabhimansatara.com/?p=923

सातारा जिल्हा परिषद निवडणूक वाद चिघळला… एस.पी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर… राजकारण तापलं!
साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळ प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी पोलिसांकडून मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर देसाई यांनी थेट विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणात शिवसेना आणि इतर आमदारांनी एस.पी तुषार दोषी यांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने चौकशी पूर्ण होईपर्यंत दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे पोलीस अधीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या निवडणुकीदरम्यान राजकीय घडामोडींनाही वेग आला होता. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही सदस्यांना आपल्या बाजूला वळवल्याचा आरोप करण्यात आला. तसेच राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदानापासून रोखण्यासाठी पोलिसांनी अटक केल्याचा मुद्दाही वादग्रस्त ठरला.

“एसपी घरगड्यासारखे वागले… त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे,” अशी जोरदार मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली होती.
दरम्यान, ४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत. त्याआधीच झालेल्या या कारवाईमुळे साताऱ्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/sp-tushar-doshi_forced-leave-for-zp-election-argument/feed/ 0 923