#GasCylender – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Sun, 15 Mar 2026 10:11:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #GasCylender – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 साताऱ्यात आजपासून होमगार्ड संरक्षण गॅस वितरणासाठी… https://swabhimansatara.com/2026/todays-satara-gas-cylinder-is-homeguared-bandobast/ https://swabhimansatara.com/2026/todays-satara-gas-cylinder-is-homeguared-bandobast/#respond Sun, 15 Mar 2026 10:11:49 +0000 https://swabhimansatara.com/?p=840

पोलिसांच्या बैठकीत निर्णय वितरकांनी मांडले समस्यांचे गाऱ्हाणे अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती निर्माण झाल्याने सातारा शहरासह जिल्ह्यातील गॅस एजन्सीजसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

काही ठिकाणी नागरिक आणि गॅस वितरण कर्मचाऱ्यांमध्ये वडाचे प्रकार घडत असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रविवारपासून गॅस सिलिंडर वितरणासाठी होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी सातारा शहर पोलिस ठाण्यात सपोनि अविनाश माने यांच्या उपस्थितीत शहरातील गॅस वितरकांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीस चंद्रकांत मावशे,हेमंत जाजू, अभय बाजारे-साळुंखे, सस्मित वाघोलीकर, यशराज भोसले, चंद्रकांत पाटील, युवराज माने यांच्यासह वितरक उपस्थित होते.

या बैठकीत वितरकांनी नागरिकांची वाढती गर्दी निर्माण होणारे तणावाचे प्रसंग आणि वितरणावेळी येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरता होमगार्ड बंदोबस्त आहेत.

]]>
https://swabhimansatara.com/2026/todays-satara-gas-cylinder-is-homeguared-bandobast/feed/ 0 840