#harshvardhansadgir – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Tue, 24 Mar 2026 06:58:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.3 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #harshvardhansadgir – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 पुण्यातील वाघोलीत रंगलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत….नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने मानाची गदा पटकावत इतिहास रचला आहे ! https://swabhimansatara.com/2026/68th-maharashtra-kesari-wrestling-tournament-nashiks-harshardhan-sadgir-double-hindkesari/ https://swabhimansatara.com/2026/68th-maharashtra-kesari-wrestling-tournament-nashiks-harshardhan-sadgir-double-hindkesari/#respond Tue, 24 Mar 2026 06:58:17 +0000 https://swabhimansatara.com/?p=887

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने दमदार कामगिरी करत महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरलं आहे. चांदीच्या गदेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत हर्षवर्धनने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला ४-३ अशा एका गुणाच्या फरकाने पराभूत करत विजय मिळवला.या लढतीत सुरुवातीपासूनच दोन्ही मल्ल आक्रमक दिसून आले. महेंद्र गायकवाडने पहिला गुण घेत आघाडी मिळवली, तर हर्षवर्धननेही लगेच प्रत्युत्तर देत बरोबरी साधली.

यानंतर ऐक्टिव्हिटी वेळेत महेंद्रला गुण मिळवता न आल्याने हर्षवर्धनला एक गुण मिळाला. शेवटच्या क्षणी हर्षवर्धनने दोन महत्त्वाचे गुण घेत आघाडी घेतली. महेंद्रनेही दोन गुण घेत जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळ संपताच हर्षवर्धनने एका गुणाच्या आघाडीने सामना जिंकला.

या विजयासह हर्षवर्धन सदगीर सातवा डबल महाराष्ट्र केसरी ठरला आहे.

विभागातून महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखचा ३-० ने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. तर गादी विभागात हर्षवर्धनने जय पाटीलला १०-० ने चितपट करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

यंदाच्या स्पर्धेत अनेक दिग्गजांना धक्का बसला असून माजी महाराष्ट्र केसरी विजेते शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील आणि पृथ्वीराज मोहोळ यांना अंतिम फेरीपूर्वीच पराभव पत्करावा लागला.

विजेत्या हर्षवर्धन सदगीरला मानाची चांदीची गदा, टोयोटो फॉर्च्यूनर कार आणि ५ लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात आले.

महाराष्ट्र केसरीच्या रंगलेल्या मैदानात हर्षवर्धनचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध……
आणि कुस्तीविश्वात नवा इतिहास घडला !

]]>
https://swabhimansatara.com/2026/68th-maharashtra-kesari-wrestling-tournament-nashiks-harshardhan-sadgir-double-hindkesari/feed/ 0 887