#IPL2026 – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Sat, 28 Mar 2026 05:46:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #IPL2026 – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 आजपासुन IPL महासंग्राम सुरू ! पहिल्याच सामन्यात मोठा थरार…RCB vs SRH https://swabhimansatara.com/2026/ipl-starts-from-todays-2026/ https://swabhimansatara.com/2026/ipl-starts-from-todays-2026/#respond Sat, 28 Mar 2026 05:46:11 +0000 https://swabhimansatara.com/?p=915

आयपीएल २०२६ चा बहुप्रतिक्षित महासंग्राम आज, शनिवार (दि. २८) पासून रंगणार आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू अर्थात आरसीबी आपल्या विजेतेपदाच्या बचावासाठी सज्ज झाली आहे. उद्घाटनाच्या सामन्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा सामना सनरायजर्स हैदराबाद या तगड्या संघाशी होणार आहे.

या हायव्होल्टेज सामन्यात सर्वांच्या नजरा असतील त्या विराट कोहलीच्या खेळीवर. कोहलीसोबत फिल सॉल्ट डावाची सुरुवात करेल, अशी शक्यता आहे. जेकब बेथेलच्या फॉर्मकडेही लक्ष असेल, तर देवदत्त पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. कर्णधार रजत पाटीदार चौथ्या क्रमांकावर संघाची धुरा सांभाळेल.

यष्टिरक्षक म्हणून जितेश शर्मा संघात असेल. टीम डेव्हिड आणि रोमारिओ शेफर्ड यांच्यासारखे स्फोटक फलंदाजही अंतिम संघात स्थान मिळवू शकतात. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारवर मोठी जबाबदारी असेल, तर मंगेश यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबादकडेही तगडी फलंदाजी फळी आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा सलामीला येतील, तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि नितीश रेड्डी मधल्या फळीत मजबुती देतील.

गोलंदाजीत जयदेव उनाडकट आणि हर्षल पटेल वेगवान आघाडी सांभाळतील, तर झिशान अन्सारी फिरकीची जबाबदारी पार पाडेल. एकूणच, IPL 2026 चा हा पहिला सामना रोमांचक होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस म्हणजे उत्सवच !

]]>
https://swabhimansatara.com/2026/ipl-starts-from-todays-2026/feed/ 0 915