#karad – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Fri, 24 Apr 2026 09:26:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #karad – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदेशाही पद्धतीने सत्कार https://swabhimansatara.com/2026/satara-shindeshahi-satara-eknathshinde/ https://swabhimansatara.com/2026/satara-shindeshahi-satara-eknathshinde/#respond Fri, 24 Apr 2026 09:26:26 +0000 https://swabhimansatara.com/?p=940

सातारा : श्रीमंत महाराजा दिल्ली दिग्विजय वीर महादजी शिंदे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य तसेच अखिल भारतीय शिंदे सरकार परिवार भारत आणि सातारा जिल्हा शिवसेना अवजड वाहतूक सेना यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री Eknath Shinde यांचा साताऱ्यात भव्य सत्कार करण्यात आला.

या वेळी शिंदेशाही परंपरेनुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांना पगडी, शाल आणि तलवार देऊन गौरविण्यात आले. या सत्कार सोहळ्याला कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विकासकामांवर भर देत राज्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरणात या कार्यक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-shindeshahi-satara-eknathshinde/feed/ 0 940
तासवडे एमआयडीसी, कराड येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. https://swabhimansatara.com/2026/taswde_midc-karad_chemical-company-explosion/ https://swabhimansatara.com/2026/taswde_midc-karad_chemical-company-explosion/#respond Tue, 31 Mar 2026 06:21:21 +0000 https://swabhimansatara.com/?p=928

तासवडे एमआयडीसी, कराड येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. एस.के.एस. केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन संपूर्ण परिसर हादरून गेला.सकाळी साडेआठच्या सुमारास पहिला जोरदार स्फोट झाला. त्यानंतर अल्पावधीतच आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झाले. या स्फोटांचा आवाज तब्बल १० किलोमीटर परिसरात ऐकू आला, ज्यामुळे ग्रामस्थांच्या कानठळ्या बसल्या.

प्राथमिक माहितीनुसार, कंपनीतील बॉयलर किंवा रिअॅक्टरचा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोट इतका भीषण होता की, रिअॅक्टरचे झाकण तब्बल १०० मीटर दूर जाऊन पडले.

या स्फोटांनंतर कंपनीत भीषण आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाला तब्बल ५० ते ५५ फूट उंच उसळताना दिसत होत्या. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री कारखाना, कराड नगरपालिका आणि जयवंत शुगर कारखान्याचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, स्फोटाचा परिणाम परिसरातील गावांवरही झाला आहे. तासवडे, वराडे, वहागाव, तळबीड आणि घोणशी या गावांसह १० किलोमीटर परिसरातील घरांना तडे गेले असून, अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

मात्र, सुदैवाची बाब म्हणजे ही घटना कंपनी बंद असताना घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/taswde_midc-karad_chemical-company-explosion/feed/ 0 928
साताऱ्यात पेट्रोल पंपांची तपासणी सुरू… साठेबाजी केल्यास कडक कारवाईचा इशारा ! https://swabhimansatara.com/2026/karad-satara-petrol-pump-shortage-beware-awareness/ https://swabhimansatara.com/2026/karad-satara-petrol-pump-shortage-beware-awareness/#respond Wed, 25 Mar 2026 11:33:06 +0000 https://swabhimansatara.com/?p=891

सातारा जिल्ह्यातील कराड परिसरात पुरवठा विभागाने पेट्रोल पंपांवर अचानक धाड टाकत तपासणी मोहीम सुरू केली आहे. काही ठिकाणी पेट्रोलचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून साठेबाजी केली जात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात येत आहे. पुरवठा विभागाच्या पथकांकडून पंपांवरील स्टॉक रजिस्टर, विक्री नोंदी तसेच प्रत्यक्ष साठ्याची पडताळणी केली जात आहे. पेट्रोलचा साठा लपवून ठेवला जात आहे का, याची बारकाईने चौकशी सुरू आहे.
सध्या जिल्ह्यात पेट्रोलचा पुरवठा सुरळीत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुरवठा निरीक्षक साहिल नाईकवाडी यांनी केले आहे. पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंपांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
गॅसबाबत अपडेट:
जिल्ह्यात गॅसचा साठा मुबलक असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी गॅसचा जपून आणि योग्य वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाचे आवाहन:
पुरवठा निरीक्षक साहिल नाईकवाडी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यात पेट्रोलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
ते पुढे म्हणाले, “काही लोक मुद्दाम अफवा पसरवून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारांना बळी पडू नका.”

कारवाईचा इशारा:
जर कोणत्याही पेट्रोल पंपावर साठेबाजी आढळून आली, तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपांचे परवाने रद्द करण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गॅस साठ्याबाबत माहिती:
दरम्यान, जिल्ह्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅसचा साठा मुबलक असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जास्त गॅस साठवण्याची गरज नाही.

नागरिकांसाठी सूचना:

✔ पेट्रोल किंवा गॅसचा अनावश्यक साठा करू नका.
✔ अफवांवर विश्वास ठेवू नका.
✔ आवश्यक तेवढाच वापर करा.
✔ प्रशासनाला सहकार्य करा.

]]>
https://swabhimansatara.com/2026/karad-satara-petrol-pump-shortage-beware-awareness/feed/ 0 891
कराड पंचायत समिती इतिहासात पहिल्यांदाच भाजपने सत्ता काबीज करत केला नवा अध्याय…… https://swabhimansatara.com/2026/karad-panchyat-samiti-first-time-history-in-bjp-2026/ https://swabhimansatara.com/2026/karad-panchyat-samiti-first-time-history-in-bjp-2026/#respond Tue, 17 Mar 2026 12:19:58 +0000 https://swabhimansatara.com/?p=859

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने सत्ता काबीज करत नवा अध्याय लिहिला आहे.

पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदांवर भाजपच्या महिलांची निवड झाली आहे. आमदार डॉ. अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांच्या रणनीतीमुळे हे ऐतिहासिक सत्तांतर शक्य झाले आहे. भाजपच्या एकाही मतात फूट पडू नये यासाठी पक्षनेत्यांनी काटेकोर नियोजन केले आणि विरोधकांचा प्रभावी राजकीय ‘गेम प्लॅन’ उधळून लावला.

“भाजपचा कराड पंचायत समितीवर पहिल्यांदाच झेंडा”—-
“महिलांच्या नेतृत्वाला प्राधान्य”

निवडणुकीत कराड दक्षिणमधील विंग गणातील नंदाताई यादव यांची सभापतीपदी, तर कराड उत्तरमधील वाघेरी गणातील अनिता वेताळ यांची उपसभापतीपदी निवड झाली. या निवडीमुळे तालुक्यातील स्थानिक राजकारणात मोठा टप्पा गाठला गेला आहे.कराड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपने दमदार कामगिरी केली आहे.

१२ जिल्हा परिषद गटांपैकी ८ गटांमध्ये आणि २४ पंचायत समिती गणांपैकी १३ गणांमध्ये विजय मिळवत भाजपने स्पष्ट बहुमताचा कौल मिळवला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४, शरद पवार गटाला ३, काँग्रेसला २ आणि शिवसेना शिंदे गटाला २ जागा मिळाल्या.

📊 “भाजप – १३ / राष्ट्रवादी (अजित) – ४ / राष्ट्रवादी (शरद) – ३ / काँग्रेस – २ / शिवसेना – २”

या ऐतिहासिक विजयामुळे पंचायत समितीवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी आता खरी कसोटी कामगिरीची असणार आहे.सत्तेसोबतच जबाबदारीही वाढली आहे.

गावपातळीवरील पायाभूत सुविधा, शेतीविकास, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काम करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हे भाजपसमोरील मोठे आव्हान असेल. निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करत विकासकामांना गती देणे आवश्यक ठरणार आहे.ऐतिहासिक सत्तांतराचा आनंद एकीकडे असला, तरी दुसरीकडे जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी पंचायत समितीमार्फत प्रभावी आणि विधायक कामगिरी करणे हीच नव्या नेतृत्वाची खरी परीक्षा असणार आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/karad-panchyat-samiti-first-time-history-in-bjp-2026/feed/ 0 859
धोंडेवाडीत गव्याच्या धडकेत दोघे जखमी ; विहिरीतल्या गव्याला काढण्यात यश…. https://swabhimansatara.com/2026/karad-dhondewadhi-gawa-incidend/ https://swabhimansatara.com/2026/karad-dhondewadhi-gawa-incidend/#respond Sun, 15 Mar 2026 08:06:40 +0000 https://swabhimansatara.com/?p=835

कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथे गवा विहिरीत पडल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

धोंडेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावर वाढला आहे. दरा नावाच्या शिवारात सर्जेराव खरात यांच्या विहिरीत एक गवा पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, गाव परिसरात आणखी काही गवे फिरत असल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

रात्री उशीरा वन विभागाला गव्याला विहिरीबाहेर काढण्यात यश आले असून त्याला वन विभागाने ताब्यात घेतले आहे.

या दरम्यान गव्याने दिलेल्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सदाशिव काकडे (वय ७०) आणि वेदांत संतोष पाटील (वय १६) अशी जखमींची नावे ग्रामस्थांनी सांगितली आहेत.

घटनेनंतर गावकऱ्यांनी परिसरातील गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/karad-dhondewadhi-gawa-incidend/feed/ 0 835
साताऱ्यावर बोलण्याचा अधिकार कोणाला ? : सुषमा अंधारे यांना मंत्री देसाईंचं प्रत्युत्तर..! https://swabhimansatara.com/2026/satarakayadasuvyavstha-sushmaaandhare-shambhrurajdesai/ https://swabhimansatara.com/2026/satarakayadasuvyavstha-sushmaaandhare-shambhrurajdesai/#respond Thu, 08 Jan 2026 06:14:14 +0000 https://swabhimansatara.com/?p=760

सातारा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चांगल्या स्थितीत असून, मुंबईत बसून याबाबत चिंता व्यक्त करण्याची गरज नाही, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांना लगावला.

कराड येथे मंगळवारी नगरपालिकेत आढावा बैठक घेतल्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार बाळासाहेब पाटील आणि नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव उपस्थित होते.पालकमंत्री देसाई म्हणाले, “आम्ही साताऱ्याच्या जनतेत सातत्याने असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेची नेमकी माहिती आम्हालाच आहे. उगाच मुंबईत बसून सुषमा अंधारे यांनी साताऱ्याबाबत चिंता करू नये.”

🏛 कराड नगरपालिकेला निधी कमी पडू देणार नाही :-

कराड पालिका निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द पाळत आज आढावा बैठक घेतली असल्याचे देसाईंनी सांगितले.
“कराडकरांनी आमच्या पक्षाच्या राजेंद्रसिंह यादव यांना नगराध्यक्षपदी निवडून दिले. याआधी मंजूर केलेल्या निधीतून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला असून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप नगरसेवकांना बैठकीचे निमंत्रण नव्हते, या प्रश्नावर देसाई म्हणाले,“ही केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक होती. त्यामुळे कोणत्याही नगरसेवकांना व्यक्तिगत निमंत्रण दिले गेले नव्हते.”

अंधारे-राऊतांवर टीका : –

एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले,
“अंधारे आणि राऊत हे भाऊ-बहिणीसारखे आहेत. त्यांनी टीका करण्यापेक्षा आपली शिवसेना कितव्या क्रमांकावर आहे हे तपासावे.”

🚫 ड्रग्ज प्रकरणाशी शिंदे कुटुंबाचा संबंध नाही :-

सातारा जिल्ह्यातील ड्रग्ज प्रकरणावर बोलताना देसाई यांनी स्पष्ट केले की,
“त्या ड्रग्ज प्रकरणाशी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही. पोलिस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.”

]]>
https://swabhimansatara.com/2026/satarakayadasuvyavstha-sushmaaandhare-shambhrurajdesai/feed/ 0 760
कराडला शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाची मध्यरात्री घेतली गळाभेट ; भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंना आनंदाश्रू…. https://swabhimansatara.com/2025/karadnagaradyaksh-udaynrajebhosale-aandaashru/ https://swabhimansatara.com/2025/karadnagaradyaksh-udaynrajebhosale-aandaashru/#respond Wed, 31 Dec 2025 08:36:26 +0000 https://swabhimansatara.com/?p=719

भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपला मित्र नगराध्यक्ष झाल्याने आनंदाश्रू आवरता आले नाहीत… कराड नगरपालिकेत शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या युतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना यांची मध्यरात्री गळाभेट घेताना भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

सातारा जिल्ह्यात कराडचे राजेंद्रसिंह यादव आणि विजय यादव हे दोन्ही बंधू उदयनराजेंचे मित्र असल्याची माहिती आहे. परंतु नगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध या बंधूंमध्ये सामना रंगल्याने खासदार उदयनराजे या निवडणुकीपासून लांब होते.

मात्र आपला मित्र नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच मध्यरात्री करायला येत. उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच मध्यरात्री कराडमध्ये येत मित्राला अनोख्या शुभेच्छा..!
“पार्टी पाहिजे… पार्टी पाहिजे” असे म्हणत अनोख्या शब्दांत शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या डोळ्यांत भावुक आनंदाश्रू स्पष्टपणे पाहायला मिळाले. मित्राला अनोखे शुभेच्छा देत पार्टी पाहिजे पार्टी असे उदयनराजे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळत आहेत… भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या शिवसेना शिंदेंच्या नगराध्यक्षाची भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतलेली गळाभेट.

कराडच्या राजकारणात मैत्री, भावना आणि राजकीय समीकरणांचा हा अनोखा संगम याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता राज्यभर चांगलीच चर्चेत येणार आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2025/karadnagaradyaksh-udaynrajebhosale-aandaashru/feed/ 0 719
काले (ता.कराड)येथे बिबट्याचा हल्ला…परिसरात भीतीचे वातावरण https://swabhimansatara.com/2025/karad-kale-leopardattack/ https://swabhimansatara.com/2025/karad-kale-leopardattack/#respond Sat, 27 Dec 2025 12:07:51 +0000 https://swabhimansatara.com/?p=696

काले (ता.कराड) येथे धक्कादायक घटना समोर आली असून, प्रगतिशील शेतकरी संतोष पाटील यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. काले आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

संतोष पाटील हे गुरुवारी रात्री काले येथून संजयनगर येथील त्यांच्या घरी मोटारसायकलवरून जात होते. काले–संजयनगर रस्त्यावरील गुंडगेचा माळ शिवारात उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दिशेने झेप घेतली. बिबट्या अंगावर येताच संतोष पाटील यांनी प्रसंगावधान राखत मोटारसायकलचा हँडल घट्ट पकडून मान मागे वळवली. त्यामुळे ते थेट हल्ल्यातून थोडक्यात बचावले. मात्र, बिबट्याच्या पायांची नखे गळ्याला लागल्याने पाटील जखमी झाले.

जखमी अवस्थेतही धैर्य न सोडता संतोष पाटील सुखरूप घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी तत्काळ मोबाईलद्वारे गावातील युवकांना घटनेची माहिती दिली. काले येथील दवाखान्यात त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. बिबट्याचा हल्ला थेट गळ्याच्या दिशेने झाल्याने ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वनविभागाने तात्काळ दखल घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याशिवाय, नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास टाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2025/karad-kale-leopardattack/feed/ 0 696
कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन : मंत्री शंभूराज देसाई यांचा राष्ट्रवादीला खोचक टोला..! https://swabhimansatara.com/2025/karadagricultural-industrial-livebird-exhibition/ https://swabhimansatara.com/2025/karadagricultural-industrial-livebird-exhibition/#respond Sat, 27 Dec 2025 10:00:20 +0000 https://swabhimansatara.com/?p=692

कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र यावेळी उद्घाटनासाठी उपस्थित असलेले पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गाडीतून उतरताच राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टोला लगावला.

“अहो, कुठे आहेत राष्ट्रवादीचे मंत्री? एकही मंत्री नाही… शेवटी शिवसेनाच उपयोगी पडली,” असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यावर लगावला.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात आज राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा निर्माण झाली असून, कराडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उद्घाटनाच्या झालेल्या या टोलेबाजीमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अनुपस्थितीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
या प्रकारामुळे राजकीय घडामोडींवर याचा नेमका काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2025/karadagricultural-industrial-livebird-exhibition/feed/ 0 692
साताऱ्याच्या कराडजवळ घडली रात्री थरारक घटना ; उंब्रज पोलिसांनी 5 तासांत पकडला ! https://swabhimansatara.com/2025/sataraumbrajpolicecrime/ https://swabhimansatara.com/2025/sataraumbrajpolicecrime/#respond Thu, 25 Dec 2025 12:48:05 +0000 https://swabhimansatara.com/?p=670

साताऱ्याच्या कराडजवळ घडली रात्री थरारक घटना …अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताने पोलिसांना चकवा देत हातातील बेड्यांसह पळ काढला.

उंब्रज पोलिसांच्या ताब्यातून अत्याचारातील पळालेला आरोपी उंब्रज पोलिसांनी 5 तासांत पकडला. हातातील बेडयांसह आरोपीने ऊसाच्या शेतातून ठोकली होती. धूम पुणे येथे पहाटे 3 वाजता पोलिसांनी पकडला आरोपी उंब्रज पोलिसांच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर पोलीस गाडीतून खाली उतरल्याच्या संधीचा फायदा घेत आरोपी झाला होता.

आरोपीला कराड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुण्यातून घेतले ताब्यात आरोपीला उंब्रज पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

पसार आरोपीचे नाव :- अनिकेत प्रकाश लोहार

]]>
https://swabhimansatara.com/2025/sataraumbrajpolicecrime/feed/ 0 670