#mahableshwar – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Mon, 16 Mar 2026 09:47:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #mahableshwar – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 पाचगणी चुलींवर चालला हॉटेल….व्यवसाय पर्यटननगरीत गॅस संकट…. https://swabhimansatara.com/2026/pachgani-gas-shortage/ https://swabhimansatara.com/2026/pachgani-gas-shortage/#respond Mon, 16 Mar 2026 09:46:44 +0000 https://swabhimansatara.com/?p=848

गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळित झाल्याने आधुनिक गॅस शेगड्यांच्या जागी आता पुन्हा धूर ओकणाऱ्या पारंपरिक लाकडी चुली पेटल्याचे चित्र पर्यटननगरीत पाहायला मिळत आहे. यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक गणित तर बिघडलेच आहे, शिवाय पर्यटकांना सेवा देतानाही त्यांची मोठी कसरत होत आहे.

हवेतील गारवा आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरणाऱ्या पाचगणी शहरात सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि छोटे खाद्य विक्रेते अक्षरश हवालदिल झाले आहेत.

पाचगणी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ असल्याने येथील अर्थचक्र प्रामुख्याने हॉटेल्स, खानावळी आणि फास्ट फूड स्टॉल्सवर अवलंबून आहे. मात्र, गॅस वितरणातील अनियमिततेमुळे हॉटेल मालकांना दोन-दोन दिवस सिलिंडरच प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक ठिकाणी गॅस संपल्याने दुकाने बंद ठेवण्याची किंवा मोजकेच पदार्थ बनवण्याची वेळ आली आहे.

याचा सर्वाधिक फटका चहा नाश्ता स्टॉल, चणा विक्रेते आणि लहान खानावळींना बसत असून, उरलासुरला व्यवसाय टिकवण्यासाठी त्यांना लाकूड फाट्याचा आधार घ्यावा लागत आहे.
विद्युत उपकरणांचा खर्च परवडत नसल्याने अनेक विक्रेत्यांनी हॉटेलच्या मागे किंवा मोकळ्या जागी चुली मांडल्या आहेत. मात्र, चुलीवर स्वयंपाक करताना लागणारा वेळ, होणारा धूर आणि त्यातून येणारा थकवा यामुळे कामगारांचेही हाल होत आहेत. ग्राहकांना वेळेवर ऑर्डर देता येत नसल्याने अनेकदा पर्यटक नाराज होऊन परत जात आहेत. व्यवसाय मंदावलेला असतानाच गॅसअभावी मिळणारे उत्पन्नही बुडत असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार आणि रोजचा खर्च भागवणे जिकिरीचे झाले आहे.
गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांनी आपला मोर्चा लाकडाकडे वळवला आहे. सध्या बाजारात जळाऊ लाकूड ७ रुपये किलो दराने उपलब्ध आहे. . गॅसअभावी व्यवसाय आधीच मंदावलेला असताना आता वाढत्या खर्चामुळे छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. त्यामुळे गॅसचा नियमित पुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/pachgani-gas-shortage/feed/ 0 848
महाबळेश्वर येथे तापमानाचा पारा घसरल्यामुळे ; तापमान 10* वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरात 8 अंशापर्यंत.. https://swabhimansatara.com/2025/mahableshwarthandi-newyear-tapman-aansh/ https://swabhimansatara.com/2025/mahableshwarthandi-newyear-tapman-aansh/#respond Wed, 31 Dec 2025 08:54:14 +0000 https://swabhimansatara.com/?p=722

महाबळेश्वरमध्ये थंडीने अक्षरशः कडाक्याचा जोर धरला आहे. तापमानाचा पारा खूप मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे
वेण्णा लेक परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांच्या छतांवर हिमकण गोठल्याचे पाहायला मिळाले आहे.

आज सकाळी महाबळेश्वर शहरात तापमान १० अंश सेल्सिअस नोंदवले गेले,तर वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरात तापमान
८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. थंडीमुळे पहाटेच्या वेळेस संपूर्ण परिसरावर दाट धुक्याची चादर पसरलेली दिसून आली.

दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले असून, थंडी, धुके आणि हिमकणांचा अनुभव पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांनंतर महाबळेश्वरमध्ये हिमकणांचे दर्शन पर्यटकांना मिळत असून, हा निसर्गरम्य अनुभव पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे.

थंडीचा जोर वाढत असताना, प्रशासनाकडून नागरिकांना आणि पर्यटकांना
योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.

तर आपल्याकडे थंडीचे प्रमाण कसे आहे. हे नक्कीच सांगू शकता ?

]]>
https://swabhimansatara.com/2025/mahableshwarthandi-newyear-tapman-aansh/feed/ 0 722
महाबळेश्वर पर्यटन स्थळी थंडीची हुडहुडी : पर्यटकांसह, शालेय सहलीमुळे नववर्षाच्या स्वागतासाठी गुलाबी थंडीत महाबळेश्वर फुलले..! https://swabhimansatara.com/2025/minimahableshwartourist2026newyear/ https://swabhimansatara.com/2025/minimahableshwartourist2026newyear/#respond Sat, 27 Dec 2025 08:47:06 +0000 https://swabhimansatara.com/?p=688

काय मग मंडळी नवीन वर्षी कुठे? फिरायला जाण्याचा प्लान करत आहात. आपल्या सातारच्या मिनी काश्मीरला म्हणजेच महाबळेश्वरला फॅमिलीसोबत प्लान असेल तर नक्कीच हि माहिती तुमच्या साठी महत्वाची आहे. पाहूयात खालीलप्रमाणे महाबळेश्वर पर्यटन स्थळी थंडीची हुडहुडी सह पर्यटकांची रेलचेल वाढली, पर्यटकांसह, शालेय सहलीमुळे महाबळेश्वर मध्ये तोबा गर्दी.

सध्या नाताळ मुळे गुलाबी थंडी साठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर पर्यटन स्थळ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.पर्यटकांची देखील चांगलीच रेलचेल वाढले असून महाबळेश्वर, पाचगणी या वर्ल्ड हेरिटेज पर्यटन स्थळ हे पर्यटकांनी भरण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातून नव्हे तर विविध राज्यांमधून लाखो पर्यटन या थंड हवेच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देत आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर नगरीमध्ये येऊ लागले आहेत. आणि या गुलाबी थंडीचा आनंद घेऊ लागले आहेत. महाबळेश्वर मधील बाजारपेठा या गजबजल्या आहेत.

दरम्यान, महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरात पर्यटक नौकाविहाराचा आनंद घेताना दिसत आहेत.
एकूणच नाताळ–नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटन हंगाम सध्या तेजीत असून पर्यटकांचा उत्साह वाढताना आपल्याला पाहायला मिळताना दिसत आहेत .

]]>
https://swabhimansatara.com/2025/minimahableshwartourist2026newyear/feed/ 0 688
सह्याद्रीवर ‘नवीन महाबळेश्वर : १ लाख हेक्टर प्रकल्पावर पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध https://swabhimansatara.com/2025/new-mahableshwar/ https://swabhimansatara.com/2025/new-mahableshwar/#respond Tue, 09 Dec 2025 07:10:17 +0000 https://swabhimansatara.com/?p=531

सह्याद्रीच्या संवेदनशील पर्वतरांगांमध्ये “नवीन महाबळेश्वर” प्रकल्प गुप्तपणे सुरू असून पर्यावरणप्रेमींनी त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (MSRDC) हा १२,००० कोटींचा प्रकल्प सोपवला आहे. या प्रकल्पासाठी सातारा, पाटण, जावली व महाबळेश्वर तालुक्यातील एकूण ५२९ गावांमधील सुमारे एक लाख हेक्टरहून अधिक जमीन वापरली जाणार आहे, त्यातील १०० गावे पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहेत.
माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी दिलेल्या अहवालात पर्यटन व विकासामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्टपणे नमूद असूनही हा प्रकल्प पुढे नेला जात आहे. विरोध असूनही अनेक हरकती अद्याप निकाली निघालेल्या नाहीत आणि प्रकल्पात नेमके काय केले जाणार याचाही स्पष्ट आराखडा नाही.
प्रकल्पात जलक्रीडा, बोटिंग, स्कूबा डायव्हिंग, हाऊस-बोट, होम-स्टे यांसारख्या पर्यटन उपक्रमांची आखणी आहे. सरकारचे म्हणणे आहे की, यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि स्थलांतर कमी होईल. परंतु प्रत्यक्षात या भागातील बरीच जमीन बाहेरील व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याने स्थानिकांना त्यांच्या जमिनीवरच मजूर म्हणून काम करावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जाते. यात अधिक आश्चर्याची बाब म्हणजे, पर्यावरण आणि वनसंवर्धनाचा अनुभव नसलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हा मोठा प्रकल्प सोपवण्यात आला आहे. दरम्यान, प्रकल्पात असंख्य हरकती दाखल झाल्या असल्या तरी त्या निकाली काढण्यात आलेल्या नाहीत… आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन महाबळेश्वरमध्ये नेमके काय होणार आहे. याची अद्याप स्पष्ट माहितीही देण्यात आलेली नाही.

💬 स्थानिकांमध्ये मतभेद

एका बाजूला काही स्थानिकांचा विश्वास आहे की—

  • जलाशयातील बोटिंग, स्कूबा डायविंग, हाऊसबोट, वॉटर स्पोर्ट्स यामुळे रोजगार वाढेल,
  • स्थलांतरित लोक परत गावाकडे येऊ शकतील, आणि गावे पुन्हा बहरतील.

तर दुसरीकडे स्थानिकांमध्येच एक वेगळीच चिंता—

  • या भागातील बरीच जमीन मुंबई–पुण्याच्या व्यापाऱ्यांनी विकत घेतली,

त्यामुळे भविष्यात स्थानिकांना रोजगार मिळेल पण मालक मात्र बाहेरचेच असतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

📢 आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जसाच्या तसा उभा राहतो—

नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची खरी गरज काय?
पर्यावरणाच्या किंमतीवर विकास किती योग्य?
आणि सह्याद्रीचे भविष्य कोणाच्या हातात?

]]>
https://swabhimansatara.com/2025/new-mahableshwar/feed/ 0 531