#MarathaTarun – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Fri, 19 Dec 2025 11:33:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #MarathaTarun – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 मराठा तरुणांचे प्रमाणपत्र नाकारल्याचा आरोप : बोर्ड मीटिंग न घेता नव्या अटी-शर्ती ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार नेणार : नरेंद्र पाटील https://swabhimansatara.com/2025/annasahebmahamandalmarathataruncmdevendraphadnvis-narendrapatil/ https://swabhimansatara.com/2025/annasahebmahamandalmarathataruncmdevendraphadnvis-narendrapatil/#respond Fri, 19 Dec 2025 11:33:28 +0000 https://swabhimansatara.com/?p=614

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजावर गंभीर आरोप झाले आहेत. महामंडळाचे संचालक विजय देशमुख यांनी जाणीवपूर्वक बोर्ड मीटिंग न घेता प्रमाणपत्रांसाठी नव्या अटी-शर्ती लागू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मराठा समाजातील तरुण उद्योजक होण्यापासून वंचित राहत असल्याचं म्हटलं जात आहे. जिल्ह्यानुसार किती लाभार्थी असावेत याबाबत कोणताही ठोस आकडा निश्चित नसतानाही,
काही मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्रे नाकारली जात असल्याचा आरोप आहे.निवडणुकीचे कारण पुढे करत, संबंधित ठिकाणी LY वापरण्यात आल्याचाही गंभीर दावा करण्यात आला आहे.

हा विषय इतका गंभीर आहे की, थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात येणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. महामंडळाची बोर्ड मीटिंग न घेता अटी-शर्ती बदलल्या जात आहेत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना अन्याय सहन करावा लागत आहे. हा विषय मी थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या द्वेषी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

भुजबळ यांनी तीन वेळा महामंडळाचा उल्लेख केला,सारथीचा संदर्भ देत निजामकालीन आरक्षणाचा उल्लेख केल्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी असल्याचं सांगण्यात आलं. मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेप्रमाणेच महामंडळाचे MD काम करत असल्याचा मला ठाम विश्वास आहे. निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे मुख्यमंत्री उपलब्ध नसले तरी, काल दूरध्वनीवर चर्चा झाली असून सोमवारी प्रत्यक्ष भेटीत संपूर्ण विषय मांडणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळातील कथित मनमानी कारभारावरून आता राजकीय व सामाजिक वाद पेटण्याची शक्यता,
तर मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2025/annasahebmahamandalmarathataruncmdevendraphadnvis-narendrapatil/feed/ 0 614