#MarathiSahityaSanmelan2026 – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Sat, 03 Jan 2026 08:05:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #MarathiSahityaSanmelan2026 – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 सातारा ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटनप्रसंगी : मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा – मुख्यमंत्री फडणवीस https://swabhimansatara.com/2026/satara-aakhilbhartiysahityasanmelan2026/ https://swabhimansatara.com/2026/satara-aakhilbhartiysahityasanmelan2026/#respond Sat, 03 Jan 2026 08:05:56 +0000 https://swabhimansatara.com/?p=736

या संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी, मावळा फाऊंडेशन सातारा आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने करण्यात आले असून सध्या सुरू असलेल्या महानरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठीचा मुद्दा तापला आहे. त्यात मुंबईसारख्या प्रमुख महानगरपालिकेमध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून स्पष्ट संदेश दिला आहे.

अभिजात मराठीला राजमान्यता मिळाली आहे. आता लोकमान्यता मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात फक्त मराठी भाषाच सक्तीची राहणार आहे. अन्य कुठल्याही भाषेची सक्ती केली जाणारा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले असून दिल्ली येथे पार पडलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे पदभार सुपूर्त केल्याच्या घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, “असं जर राजकारणातही चालत असतं, तर किती छान झालं असतं.” स्वराज्याच्या भूमीत असे आदर्शवत कार्य घडत असल्याबद्दल त्यांनी सारस्वतांना प्रणाम केला.

महाराष्ट्रातील साहित्य संस्थांमध्ये सरकारने कधीही हस्तक्षेप केला नाही आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत तो होणारही नाही. साहित्य क्षेत्रात राजकारण आणू नका, असा चिमटाही फडणवीस यांनी यावेळी काढला. भारतीय भाषांना विरोध करून विदेशी भाषांना पायघड्या का घातल्या जातात, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी लेखिका मृदुला गर्ग, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, आ. डॉ. अतुल भोसले, साहित्यनगराध्यक्ष आ. मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-aakhilbhartiysahityasanmelan2026/feed/ 0 736