#Pusegaon – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Wed, 17 Dec 2025 06:57:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #Pusegaon – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 पुसेगाव : थरारक अंतिम फेरी | सचिन–लक्षाने पटकावला श्री सेवागिरी हिंदकेसरी किताब | https://swabhimansatara.com/2025/maharashtraculture-bailgadisharyat-sachin-lakshapusegaonsevagiriyatra/ https://swabhimansatara.com/2025/maharashtraculture-bailgadisharyat-sachin-lakshapusegaonsevagiriyatra/#respond Wed, 17 Dec 2025 06:57:47 +0000 https://swabhimansatara.com/?p=588

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतील लाखो बैलगाडी शर्यत शौकिनांचे आकर्षण असलेल्या श्री सेवागिरी यात्रोत्सवानिमित्त आयोजित श्री सेवागिरी हिंदकेसरी बैलगाडी शर्यतीला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शर्यतप्रेमींमुळे पुसेगाव येथे अक्षरशः जनसागर उसळला होता.

उत्कंठावर्धक ठरलेल्या अंतिम फेरीत शाहिदभाई मुलाणी, नातेपुते यांचा ‘सचिन’ आणि श्रीनाथ ज्वेलर्स, आंबेगाव यांचा ‘लक्षा’ या आदत किंग बैलजोडीने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयी बैलगाडीने २ लाख ७८ हजार रुपयांचे रोख बक्षीस जिंकत ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’चा मानाचा किताब पटकावला. या गाडीचे चालक भैया ड्रायव्हर (भांबवडे) यांना ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी ड्रायव्हर’ या किताबाने गौरविण्यात आले.

पुसेगाव येथील राष्ट्रीय महामार्गालगत बैल बाजाराजवळील मैदानात सकाळी ७ वाजता मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते मानाचा नारळ फोडून शर्यतीचा शुभारंभ झाला. यावेळी चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

ही तीन राउंडची भव्य बैलगाडी शर्यत असून यंदा तब्बल १००१ बैलगाड्यांची विक्रमी नोंद झाली. गटाचे १११ फेरे आणि १२ सेमीफायनल फेऱ्या पार पडल्या. कमिटीच्या शिस्तबद्ध व उत्कृष्ट नियोजनामुळे एका दिवसातच उजेडात अंतिम फेरी पूर्ण करण्यात आली.

विजेते व मानकरी : द्वितीय क्रमांक – स्व. पंढरीशेठ फडके (विघर, पनवेल) यांचा सर्जा व मनोहर पाटील (छत्रपती संभाजीनगर) यांचा लखन
तृतीय क्रमांक – शौर्य शरदशेठ माने (देवीखिंडी, साखरवाडी) यांचा बावऱ्या व रणवीर राहुलभाई पाटील (आडवली, कल्याण) यांचा मथुर तसेच गोपीनाथशेठ तुंगे (कर्जत), स्व. मनोहरशेठ खाणावकर (कळंबोली), तुषार पैलवान (म्हसुर्णे), दत्तात्रय प्रकाश जगदाळे (कुमठेकर), उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड (चिंचाळे), सांडू मिस्त्री (तळेगाव), सूर्या सम्राट ग्रुप (माळेवाडी) आदी अनेक नामवंत बैलगाडी मालकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

देश–विदेशातून प्रेक्षकांची उपस्थिती देशातील मानाची हिंदकेसरी बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही प्रेक्षक पुसेगावमध्ये दाखल झाले होते. रशियाहून आलेल्या परदेशी पाहुण्यांनीही शर्यतीचा आनंद लुटला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महामार्गाच्या दुतर्फा दिवसभर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

या एकदिवसीय भव्य आयोजनामुळे कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

शेवटी सर्व विजेत्या बैलगाडी मालकांना रोख रक्कम व प्रत्येकी दोन ढाली देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक सेमीफायनलमधील मानकरी आणि गट विजेत्यांनाही विशेष सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.

]]>
https://swabhimansatara.com/2025/maharashtraculture-bailgadisharyat-sachin-lakshapusegaonsevagiriyatra/feed/ 0 588
श्री सेवागिरी यात्रेस आजपासून प्रारंभ : पुसेगावात २० डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव / सलग १२वे वर्ष https://swabhimansatara.com/2025/pusegaon-yatraspecial-youthfestival/ https://swabhimansatara.com/2025/pusegaon-yatraspecial-youthfestival/#respond Sun, 14 Dec 2025 09:32:45 +0000 https://swabhimansatara.com/?p=571

पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त जिल्हास्तरीय श्री सेवागिरी खुला युवा महोत्सवाचे आयोजन शनिवार, दिनांक २० डिसेंबर रोजीसकाळी ९.३० वाजता करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे सलग बारावे वर्ष असून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयातील इच्छुक व होतकरू कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने देवस्थान ट्रस्टतर्फे यात्रास्थळी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात माहिती देताना देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकनृत्य (लाईव्ह), रेकॉर्ड लोकनृत्य,पथनाट्य,सुगम गायन आणि समूहगीत अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षीस, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

तसेच स्पर्धकांसाठी प्रवास खर्च, जेवण व नाष्ट्याची व्यवस्था ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.सर्व स्पर्धकांसाठी
प्रवेश पूर्णतः मोफत असून स्पॉट नोंदणी स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत करता येणार आहे. लोकनृत्य रेकॉर्ड डान्ससाठी लाईव्ह लोकनृत्याची नियमावली बंधनकारक राहील,तसेच परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.

या युवा महोत्सवात जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांतील इच्छुक कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव,रणधीर जाधव,बाळासाहेब जाधव,सचिन देशमुख आणि गौरव जाधव यांनी केले आहे.

यात्रेकरूंना विविध कला प्रकारांचा आनंद घेता यावा, यासाठी यंदाच्या युवा महोत्सवाचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून
हा महोत्सव निश्चितच युवा कलावंतांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2025/pusegaon-yatraspecial-youthfestival/feed/ 0 571
पुसेगावमध्ये श्री सेवागिरी केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार : हर्षवर्धन सदगीर विरुद्ध दिनेश गुलिया यांच्यात मुख्य लढत.. https://swabhimansatara.com/2025/pusegaonkesari-wrestling-tournament2025/ https://swabhimansatara.com/2025/pusegaonkesari-wrestling-tournament2025/#respond Sat, 13 Dec 2025 08:05:20 +0000 https://swabhimansatara.com/?p=562

श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त तसेच प.पू. नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार, दि. १७ रोजी पुसेगाव येथे श्री सेवागिरी केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे पुसेगावच्या आखाड्यात देशभरातील नामांकित मल्ल एकमेकांसमोर उभे ठाकणार असून कुस्तीशौकिनांना तुल्यबळ आणि चुरशीच्या लढती पाहण्याची संधी मिळणार आहे.
मुख्य आकर्षण लढत –
महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर विरुद्ध हिंदकेसरी व भारत केसरी पै. दिनेश गुलिया
श्री सेवागिरी केसरी किताबासाठी थेट सामना.
विजेत्यास भव्य बक्षीस –
चांदीची गदा, रोख रक्कम आणि श्री सेवागिरी केसरीचा मानकरी होण्याचा मान.
देशभरातील नामांकित मल्लांची हजेरी –
महाराष्ट्र केसरी, भारत केसरी, हिंदकेसरी, इंटरनॅशनल मेडलिस्ट मल्लांचा सहभाग.
इतर प्रमुख चटकदार लढती –
पै. दादा शेळके विरुद्ध पै. शानवीर कोहली (पंजाब)
पै. रविराज चव्हाण विरुद्ध पै. जॉन्टी गुज्जर पै. शुभम सिदनाळे विरुद्ध पै. संदीप मोटे पै.कालीचरण सोलनकर विरुद्ध पै. लकी कोहली यांसह अनेक तगड्या काट्याच्या लढती
१७५+ ते २०० प्रेक्षणीय कुस्त्या –
कुस्तीशौकिनांना दिवसभर मैदानी कुस्तीचा थरार अनुभवता येणार.
आधुनिक सुविधा –
ड्रोन कॅमेरे, दोन मोठ्या स्क्रीन, सुसज्ज गॅलरी, दर्जेदार पंच व समालोचक.
थेट प्रक्षेपण –

स्पर्धेचे युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण, देशभरातील रसिकांना पाहता येणार.
आयोजनासाठी विशेष परिश्रम –ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांचे योगदान.
कुस्तीशौकिनांसाठी पर्वणी –
पुसेगावच्या आखाड्यात रंगणाऱ्या अव्वल दर्जाच्या, रंगतदार व तगड्या कुस्त्या.

पुसेगावच्या आखाड्यात अव्वल दर्जाचे मल्ल आणि तगड्या कुस्त्यांमुळे ही स्पर्धा कुस्तीशौकिनांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार असल्याचे मत ट्रस्टचे चेअरमन डॉ. संतोष वाघ यांनी व्यक्त केले आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2025/pusegaonkesari-wrestling-tournament2025/feed/ 0 562