#sahyadri – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Thu, 05 Mar 2026 13:04:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #sahyadri – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प : जंगलात प्रेम आणि वर्चस्वाची लढत!शिलेदार’ची दमदार एन्ट्री; जंगलात प्रेम आणि वर्चस्वाची नवी कहाणी https://swabhimansatara.com/2026/sahyandri-vyagrah-praklp_-shiledar-vaghachi-damdar-entry/ https://swabhimansatara.com/2026/sahyandri-vyagrah-praklp_-shiledar-vaghachi-damdar-entry/#respond Thu, 05 Mar 2026 12:55:48 +0000 https://swabhimansatara.com/?p=805

सह्याद्रीच्या दाट अरण्यात सध्या रंगली आहे प्रेम, वर्चस्व आणि नैसर्गिक निवडीची रोमांचक कहाणी…सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्या नर वाघाची नोंद झाली असून त्याला STR T9 ‘शिलेदार’ असे नाव देण्यात आले आहे. या नव्या आगमनामुळे प्रकल्पातील वाघांची संख्या आता सातवर पोहोचली आहे.विशेष म्हणजे हा ‘शिलेदार’ सध्या वाघीण T5 ‘तारा’च्या क्षेत्रात तिच्या मागोमाग फिरताना कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला आहे. पण ताराच्या क्षेत्रात आधीपासूनच T1 ‘सेनापती’ आणि T2 ‘सुभेदार’ हे दोन बलाढ्य नर वावरत आहेत.म्हणजेच आता जंगलात एकच प्रश्न पडला आहे.

तारा कोणाची साथ स्वीकारणार? अनुभवी सेनापती, ताकदवान सुभेदार की नवखा पण धाडसी शिलेदार?

दरम्यान सह्याद्री-कोकण टायगर SKT 21 च्या हालचालीमुळे टायगर कॉरिडॉरची उपयुक्तता पुन्हा अधोरेखित झाली आहे.नव्या वाघाच्या आगमनामुळे सह्याद्रीतील जैवविविधतेला नवे बळ मिळाले असून, जंगलातील ही रोमांचक घडामोड वन्यजीव अभ्यासकांसाठी विशेष महत्त्वाची ठरत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि वाघीण कोण कोणाच्या क्षेत्रात?

सध्या जंगलातील ‘प्रेम आणि वर्चस्व’ असे चित्र आहे —

T5 ‘तारा’ – परिपक्व वाघीण, सध्या केंद्रस्थानी

T1 ‘सेनापती’ – बलाढ्य नर, आधीपासून ताराच्या क्षेत्रात

T2 ‘सुभेदार’ – दुसरा प्रभावी नर, त्याच परिसरात

T9 ‘शिलेदार’ – नवा तरुण नर, गेल्या दोन महिन्यांपासून ताराच्या मागेमागे

चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात कॅमेरा ट्रॅपमध्ये ‘शिलेदार’ वारंवार दिसून आला आहे. विशेष म्हणजे तो सध्या ताराच्या क्षेत्रात फिरताना आढळतो आहे.सध्या प्रकल्पातील वाघांची यादी :-

T1 – सेनापती T2 – सुभेदार T3 – बाजी T4 – चंदा T5 – तारा T6 – हिरकणी T9 – शिलेदार

क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले की, “नव्या नर वाघाची नोंद सह्याद्रीसाठी आनंदाची बाब आहे. यामुळे येथील जैवविविधता आणि नैसर्गिक प्रजनन प्रक्रिया अधोरेखित होते.”

त्यामुळे तारा वाघीण कोणाची साथ स्वीकारणार, कोणाच्या पिल्लांना जन्म देणार, हे पाहावं लागणार आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/sahyandri-vyagrah-praklp_-shiledar-vaghachi-damdar-entry/feed/ 0 805
पाटण तालुक्यातील माईंगडेवाडीत : वाघिणीचा मुक्त संचार अवतरली चक्क ‘तारा’ वाघीण https://swabhimansatara.com/2025/pathanmaigadewaditaravaghin/ https://swabhimansatara.com/2025/pathanmaigadewaditaravaghin/#respond Thu, 25 Dec 2025 12:22:18 +0000 https://swabhimansatara.com/?p=666

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली अभयारण्यात निसर्गमुक्त करण्यात आलेली ‘तारा’ वाघीण बुधवारी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात असलेल्या माईंगडेवाडी गावाजवळ आढळून आली.

माईंगडेवाडी येथील मुक्कामी एसटी मार्गस्थ होत असताना रस्त्याजवळच्या झुडूपातून ही वाघीण अचानक रस्त्यावर आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक वाघ समोर आल्यामुळे रस्त्यातून प्रवास करणाऱ्या इतर चालकांनीही वाहने रस्त्यातच थांबवली. रस्ता ओलांडून ही वाघीण नजीकच्या गवताळ भागात निघून गेली.

काही वेळ रस्त्यावर उभी राहिल्यानंतर ‘तारा’ वाघीण रस्ता ओलांडून नजीकच्या गवताळ भागात निघून गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

‘तारा’ वाघीणीचा हा मुक्त संचार पर्यावरण प्रेमींसाठी दिलासादायक असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि वनविभागाकडून सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्या असून नागरिकांना अनावश्यक हालचाली टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

]]>
https://swabhimansatara.com/2025/pathanmaigadewaditaravaghin/feed/ 0 666
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला नवी ताकद—टी 7-S2 वाघीण दाखल ! https://swabhimansatara.com/2025/operation-tara-t-7s2/ https://swabhimansatara.com/2025/operation-tara-t-7s2/#respond Thu, 11 Dec 2025 05:56:05 +0000 https://swabhimansatara.com/?p=554

चांदोली अभयारण्यात व्याघ्र संवर्धनाला मोठी चालना—
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेली दोन वर्षांची वाघीण टी ७–एस २ ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत सोनारली अनुकूलन कुंपणात सुरक्षितरीत्या सोडण्यात आली आहे.ही चांदोलीत दाखल झालेली ताडोबातील दुसरी वाघीण ठरली असून, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जनुकीय संवर्धनासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ८ डिसेंबर रोजी पांढरपौनी परिसरातून पकडलेल्या या वाघिणीची तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीत ती पूर्णतः तंदुरुस्त व स्थलांतरास योग्य असल्याचे स्पष्ट झाले होते.

वन विभागातर्फे सांगण्यात आले की, सॉफ्ट रीलिज पद्धतीमुळे वाघीण नव्या परिसराशी हळूहळू जुळवून घेणार आहे. चांदोलीत सुरक्षित अधिवास आणि पुरेसा भक्ष्यसाठा उपलब्ध असल्याने तिचे पुनर्स्थापन यशस्वी होण्याची पूर्ण शक्यता आहे. या संपूर्ण मोहिमेचे भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक, प्रोजेक्ट टायगरचे अधिकारी, तसेच ताडोबा व सह्याद्रीतील संयुक्त पथके सातत्याने निरीक्षण करत आहेत.वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टी ७–एस २ ची उपस्थिती सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनाला नवीन बळकटी देईल, आणि ‘ऑपरेशन तारा’मुळे राज्यातील व्याघ्रसंवर्धन चळवळीला मोठा हातभार लागणार आहे.

‘ऑपरेशन तारा’ या राज्यातील महत्त्वाकांक्षी व्याघ्र पुनर्स्थापन उपक्रमांतर्गत करण्यात आलेले हे स्थलांतर आज व्याघ्र संवर्धन क्षेत्रातील एक उल्लेखनीय पाऊल मानले जात आहे.ही वाघीण ताडोबातून चांदोलीत दाखल झालेली दुसरी मादी ठरली असून, तिच्या उपस्थितीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जनुकीय विविधता आणि व्याघ्रसंख्या वाढीस मोठी चालना मिळणार आहे. ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि रॅपिड रेस्क्यू टीम यांनी केलेल्या तपासणीत वाघीण पूर्णतः निरोगी, तंदुरुस्त आणि स्थलांतरासाठी योग्य असल्याचे दिसून आले होते.

सॉफ्ट रीलिज पद्धतीमुळे, वाघीण सुरक्षित कुंपणात काही काळ ठेवली जाणार असून, याच काळात ती नव्या परिसरातील भूभाग, भक्ष्य प्रजाती आणि स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेत राहील. खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

याबाबत बोलताना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले—
“दुसऱ्या वाघिणीचे यशस्वी पुनर्स्थापन हे आमच्या पथकांच्या कौशल्याचे प्रतीक आहे. ताडोबा आणि सह्याद्री प्रकल्पांमधील समन्वयामुळे व्याघ्र संवर्धनाची चळवळ अधिक मजबूत होत आहे.”

]]>
https://swabhimansatara.com/2025/operation-tara-t-7s2/feed/ 0 554
सह्याद्रीवर ‘नवीन महाबळेश्वर : १ लाख हेक्टर प्रकल्पावर पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध https://swabhimansatara.com/2025/new-mahableshwar/ https://swabhimansatara.com/2025/new-mahableshwar/#respond Tue, 09 Dec 2025 07:10:17 +0000 https://swabhimansatara.com/?p=531

सह्याद्रीच्या संवेदनशील पर्वतरांगांमध्ये “नवीन महाबळेश्वर” प्रकल्प गुप्तपणे सुरू असून पर्यावरणप्रेमींनी त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (MSRDC) हा १२,००० कोटींचा प्रकल्प सोपवला आहे. या प्रकल्पासाठी सातारा, पाटण, जावली व महाबळेश्वर तालुक्यातील एकूण ५२९ गावांमधील सुमारे एक लाख हेक्टरहून अधिक जमीन वापरली जाणार आहे, त्यातील १०० गावे पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहेत.
माधव गाडगीळ समितीने पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी दिलेल्या अहवालात पर्यटन व विकासामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्टपणे नमूद असूनही हा प्रकल्प पुढे नेला जात आहे. विरोध असूनही अनेक हरकती अद्याप निकाली निघालेल्या नाहीत आणि प्रकल्पात नेमके काय केले जाणार याचाही स्पष्ट आराखडा नाही.
प्रकल्पात जलक्रीडा, बोटिंग, स्कूबा डायव्हिंग, हाऊस-बोट, होम-स्टे यांसारख्या पर्यटन उपक्रमांची आखणी आहे. सरकारचे म्हणणे आहे की, यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि स्थलांतर कमी होईल. परंतु प्रत्यक्षात या भागातील बरीच जमीन बाहेरील व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याने स्थानिकांना त्यांच्या जमिनीवरच मजूर म्हणून काम करावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जाते. यात अधिक आश्चर्याची बाब म्हणजे, पर्यावरण आणि वनसंवर्धनाचा अनुभव नसलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हा मोठा प्रकल्प सोपवण्यात आला आहे. दरम्यान, प्रकल्पात असंख्य हरकती दाखल झाल्या असल्या तरी त्या निकाली काढण्यात आलेल्या नाहीत… आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन महाबळेश्वरमध्ये नेमके काय होणार आहे. याची अद्याप स्पष्ट माहितीही देण्यात आलेली नाही.

💬 स्थानिकांमध्ये मतभेद

एका बाजूला काही स्थानिकांचा विश्वास आहे की—

  • जलाशयातील बोटिंग, स्कूबा डायविंग, हाऊसबोट, वॉटर स्पोर्ट्स यामुळे रोजगार वाढेल,
  • स्थलांतरित लोक परत गावाकडे येऊ शकतील, आणि गावे पुन्हा बहरतील.

तर दुसरीकडे स्थानिकांमध्येच एक वेगळीच चिंता—

  • या भागातील बरीच जमीन मुंबई–पुण्याच्या व्यापाऱ्यांनी विकत घेतली,

त्यामुळे भविष्यात स्थानिकांना रोजगार मिळेल पण मालक मात्र बाहेरचेच असतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

📢 आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जसाच्या तसा उभा राहतो—

नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची खरी गरज काय?
पर्यावरणाच्या किंमतीवर विकास किती योग्य?
आणि सह्याद्रीचे भविष्य कोणाच्या हातात?

]]>
https://swabhimansatara.com/2025/new-mahableshwar/feed/ 0 531