#SandipMandave – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Thu, 26 Mar 2026 11:36:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #SandipMandave – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 पोलीसांकडून एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न ,अनिल देसाई,संदीप मांडवे यांचा गंभीर आरोप… https://swabhimansatara.com/2026/anildesaisandeepmandve-attempting-to-carry-out-an-encounter-by-the-police/ https://swabhimansatara.com/2026/anildesaisandeepmandve-attempting-to-carry-out-an-encounter-by-the-police/#respond Thu, 26 Mar 2026 11:36:13 +0000 https://swabhimansatara.com/?p=902

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या सदस्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ नव्हे, तर ‘ऑपरेशन दरोडा’ राबवला, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी केला आहे.

साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दावा केला की, ही निवडणूक नसून एक मिशन होते. निवडणुकीपूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, मोबाईल जप्त केले आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही पोलिस अधिकारी “ऑपरेशन यशस्वी करून येतो” असे बोलत होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.

“आमच्यावर ३० वर्षांत एकही गंभीर गुन्हा नाही, पण या निवडणुकीसाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. कायद्याचे रक्षकच लोकशाहीची हत्या करत आहेत.”

याचवेळी त्यांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांना एन्काऊंटरची भीती दाखवण्यात आली. जिल्हा परिषद इमारतीतच २५ ते ३० पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला.तसेच, या संपूर्ण प्रकरणामागे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला आहे.

“सत्तेसाठी पोलिसांचा वापर करून षडयंत्र रचण्यात आले. आम्हाला धमकावण्यात आले.”

दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पुन्हा राबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच, महाबळेश्वर न्यायालयाने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याची माहितीही त्यांनी दिली.

या प्रकरणामुळे साताऱ्यातील राजकारण तापण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत या वादाला आणखी रंग चढण्याची चिन्हे आहेत.

]]>
https://swabhimansatara.com/2026/anildesaisandeepmandve-attempting-to-carry-out-an-encounter-by-the-police/feed/ 0 902