#satara – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Fri, 24 Apr 2026 09:49:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #satara – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 साताऱ्यात खुनाचा कट उधळला; दोघांना अटक, शस्त्रसाठा जप्त https://swabhimansatara.com/2026/satara-lcb-news/ https://swabhimansatara.com/2026/satara-lcb-news/#respond Fri, 24 Apr 2026 09:49:32 +0000 https://swabhimansatara.com/?p=944

सातारा (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील डेबेवाडी परिसरात खुनाचा कट रचणाऱ्या दोघांना एलसीबी पोलिसांनी अटक करून मोठा अनर्थ टाळला आहे. आरोपींकडून दोन पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे, एक कुर्हाड, एक सुरी तसेच मोबाईल आणि दुचाकी असा सुमारे ७ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून प्रतिस्पर्ध्याचा खून करण्याच्या उद्देशाने आरोपी डेबेवाडी येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खुनाचा कट रचल्याची कबुली दिली.

या कारवाईत एलसीबीचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्परता दाखवत आरोपींना अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पोलिस अधिक तपास करत असून फरार असलेल्या अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-lcb-news/feed/ 0 944
साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदेशाही पद्धतीने सत्कार https://swabhimansatara.com/2026/satara-shindeshahi-satara-eknathshinde/ https://swabhimansatara.com/2026/satara-shindeshahi-satara-eknathshinde/#respond Fri, 24 Apr 2026 09:26:26 +0000 https://swabhimansatara.com/?p=940

सातारा : श्रीमंत महाराजा दिल्ली दिग्विजय वीर महादजी शिंदे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य तसेच अखिल भारतीय शिंदे सरकार परिवार भारत आणि सातारा जिल्हा शिवसेना अवजड वाहतूक सेना यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री Eknath Shinde यांचा साताऱ्यात भव्य सत्कार करण्यात आला.

या वेळी शिंदेशाही परंपरेनुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांना पगडी, शाल आणि तलवार देऊन गौरविण्यात आले. या सत्कार सोहळ्याला कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विकासकामांवर भर देत राज्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरणात या कार्यक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-shindeshahi-satara-eknathshinde/feed/ 0 940
तासवडे एमआयडीसी, कराड येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. https://swabhimansatara.com/2026/taswde_midc-karad_chemical-company-explosion/ https://swabhimansatara.com/2026/taswde_midc-karad_chemical-company-explosion/#respond Tue, 31 Mar 2026 06:21:21 +0000 https://swabhimansatara.com/?p=928

तासवडे एमआयडीसी, कराड येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. एस.के.एस. केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन संपूर्ण परिसर हादरून गेला.सकाळी साडेआठच्या सुमारास पहिला जोरदार स्फोट झाला. त्यानंतर अल्पावधीतच आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झाले. या स्फोटांचा आवाज तब्बल १० किलोमीटर परिसरात ऐकू आला, ज्यामुळे ग्रामस्थांच्या कानठळ्या बसल्या.

प्राथमिक माहितीनुसार, कंपनीतील बॉयलर किंवा रिअॅक्टरचा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोट इतका भीषण होता की, रिअॅक्टरचे झाकण तब्बल १०० मीटर दूर जाऊन पडले.

या स्फोटांनंतर कंपनीत भीषण आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाला तब्बल ५० ते ५५ फूट उंच उसळताना दिसत होत्या. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री कारखाना, कराड नगरपालिका आणि जयवंत शुगर कारखान्याचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, स्फोटाचा परिणाम परिसरातील गावांवरही झाला आहे. तासवडे, वराडे, वहागाव, तळबीड आणि घोणशी या गावांसह १० किलोमीटर परिसरातील घरांना तडे गेले असून, अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

मात्र, सुदैवाची बाब म्हणजे ही घटना कंपनी बंद असताना घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/taswde_midc-karad_chemical-company-explosion/feed/ 0 928
एसपी तुषार दोशी सक्तीच्या रजेवर… राजकारण तापलं ! सातारा जिल्हा परिषद निवडणूक वाद चिघळला… https://swabhimansatara.com/2026/sp-tushar-doshi_forced-leave-for-zp-election-argument/ https://swabhimansatara.com/2026/sp-tushar-doshi_forced-leave-for-zp-election-argument/#respond Mon, 30 Mar 2026 06:09:24 +0000 https://swabhimansatara.com/?p=923

सातारा जिल्हा परिषद निवडणूक वाद चिघळला… एस.पी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर… राजकारण तापलं!
साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळ प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी पोलिसांकडून मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर देसाई यांनी थेट विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणात शिवसेना आणि इतर आमदारांनी एस.पी तुषार दोषी यांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने चौकशी पूर्ण होईपर्यंत दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे पोलीस अधीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या निवडणुकीदरम्यान राजकीय घडामोडींनाही वेग आला होता. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही सदस्यांना आपल्या बाजूला वळवल्याचा आरोप करण्यात आला. तसेच राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदानापासून रोखण्यासाठी पोलिसांनी अटक केल्याचा मुद्दाही वादग्रस्त ठरला.

“एसपी घरगड्यासारखे वागले… त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे,” अशी जोरदार मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली होती.
दरम्यान, ४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत. त्याआधीच झालेल्या या कारवाईमुळे साताऱ्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/sp-tushar-doshi_forced-leave-for-zp-election-argument/feed/ 0 923
सातारा प्रकरणाने राज्य हादरलं ! ७५० ग्रॅम बाळाचा मृत्यू… जबाबदार कोण ? https://swabhimansatara.com/2026/satara-civil-hospital-750gm-baby-for-expired-case-in-highcourt/ https://swabhimansatara.com/2026/satara-civil-hospital-750gm-baby-for-expired-case-in-highcourt/#respond Sun, 29 Mar 2026 06:54:14 +0000 https://swabhimansatara.com/?p=919

सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शनिवारी दिवसभर आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात तळ ठोकून सखोल चौकशी केली.

विजापूर, कर्नाटक येथील अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याने सुरुवातीला गर्भपातास कायदेशीर अडचणी आल्या. मात्र, नंतर मेडिकल बोर्डाच्या परवानगीनंतर सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्यामुळे प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चाँदसाहेब शिकलगार यांनी प्रसूती केली. मात्र, अकाली प्रसूती झाल्यामुळे बाळाचे वजन केवळ ७५० ग्रॅम होते.

याच दरम्यान, बाळाला १२ तास उपाशी ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला असून, योग्य वैद्यकीय काळजी न मिळाल्यानेच अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

🟣 चौकशी अपडेट :
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीत आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत.

शनिवारी दुपारी दोन वाजता ही समिती सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल झाली.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, डॉ. चाँदसाहेब शिकलगार यांच्यासह संबंधित सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची तब्बल अनेक तास कसून चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान सर्वांचे मोबाईल बंद ठेवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी महिला व बालविकास विभागामार्फत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवार, २ एप्रिल रोजी होणार असून, त्यावेळी चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.या घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यातील महिला संघटनांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना घेराव घातला असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
या संपूर्ण प्रकरणात नेमकी चूक कुणाची? जबाबदारांवर कारवाई होणार का?
याचे उत्तर आता २ एप्रिलच्या सुनावणीत स्पष्ट होणार आहे……..

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-civil-hospital-750gm-baby-for-expired-case-in-highcourt/feed/ 0 919
आजपासुन IPL महासंग्राम सुरू ! पहिल्याच सामन्यात मोठा थरार…RCB vs SRH https://swabhimansatara.com/2026/ipl-starts-from-todays-2026/ https://swabhimansatara.com/2026/ipl-starts-from-todays-2026/#respond Sat, 28 Mar 2026 05:46:11 +0000 https://swabhimansatara.com/?p=915

आयपीएल २०२६ चा बहुप्रतिक्षित महासंग्राम आज, शनिवार (दि. २८) पासून रंगणार आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू अर्थात आरसीबी आपल्या विजेतेपदाच्या बचावासाठी सज्ज झाली आहे. उद्घाटनाच्या सामन्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा सामना सनरायजर्स हैदराबाद या तगड्या संघाशी होणार आहे.

या हायव्होल्टेज सामन्यात सर्वांच्या नजरा असतील त्या विराट कोहलीच्या खेळीवर. कोहलीसोबत फिल सॉल्ट डावाची सुरुवात करेल, अशी शक्यता आहे. जेकब बेथेलच्या फॉर्मकडेही लक्ष असेल, तर देवदत्त पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. कर्णधार रजत पाटीदार चौथ्या क्रमांकावर संघाची धुरा सांभाळेल.

यष्टिरक्षक म्हणून जितेश शर्मा संघात असेल. टीम डेव्हिड आणि रोमारिओ शेफर्ड यांच्यासारखे स्फोटक फलंदाजही अंतिम संघात स्थान मिळवू शकतात. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारवर मोठी जबाबदारी असेल, तर मंगेश यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबादकडेही तगडी फलंदाजी फळी आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा सलामीला येतील, तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि नितीश रेड्डी मधल्या फळीत मजबुती देतील.

गोलंदाजीत जयदेव उनाडकट आणि हर्षल पटेल वेगवान आघाडी सांभाळतील, तर झिशान अन्सारी फिरकीची जबाबदारी पार पाडेल. एकूणच, IPL 2026 चा हा पहिला सामना रोमांचक होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस म्हणजे उत्सवच !

]]>
https://swabhimansatara.com/2026/ipl-starts-from-todays-2026/feed/ 0 915
शिंगणापूर यात्रा २०२६ शिवपार्वती विवाहसोहळा धुमधडाक्यात…… https://swabhimansatara.com/2026/shingnapuryatra2026/ https://swabhimansatara.com/2026/shingnapuryatra2026/#respond Fri, 27 Mar 2026 10:32:08 +0000 https://swabhimansatara.com/?p=912

सातारा जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर यात्रेत गुरुवारी भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळाला. मानाच्या पागोटे बांधण्याचा सोहळा आणि मध्यरात्री पार पडलेला शिवपार्वती विवाहसोहळा यामुळे संपूर्ण शिंगणापूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.

चैत्र शुद्ध अष्टमीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिंगणापूर यात्रेत मानाच्या पागोटे म्हणजेच ध्वज बांधण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दुपारपासूनच मानाच्या पागोट्यांचे शहरात आगमन झाले. पोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि हरहर महादेवच्या जयघोषात ही पागोटी शंभू महादेव मंदिरात आणण्यात आली. मंदिरात विधिवत पूजन केल्यानंतर, कोळी समाज बांधवांनी अत्यंत साहसाने आणि परिश्रमाने शंभू महादेव मंदिर ते अमृतेश्वर मंदिराच्या कळसापर्यंत मानाचे ध्वज बांधले.जवळपास दीड तास चाललेल्या या सोहळ्यावेळी लाखो भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि जयघोषात सहभाग घेतला.

दरम्यान, मध्यरात्री बारा वाजता पारंपरिक पद्धतीने शिवपार्वती विवाहसोहळा संपन्न झाला. सनई, चौघडा, ढोल-ताशांच्या मंगलमय सुरात, विष्णू-लक्ष्मीच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.
गुलाबी रंगाची उधळण, ज्वारीच्या अक्षता आणि मंगलाष्टकांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

फटाक्यांच्या आतषबाजीत आणि हरहर महादेवच्या जयघोषात लाखो भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. यात्रेनिमित्त पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस उपअधीक्षक रणजीत सावंत आणि सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, २९ आणि ३० मार्च हे यात्रेचे मुख्य दिवस असल्याने शिंगणापूर नगरीत भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण परिसर सध्या भक्तीमय वातावरणात फुलून गेला आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/shingnapuryatra2026/feed/ 0 912
जागतिक रंगमंच दिनविशेष शाहूकला मंदिराची खास गोष्ट घडली आहे…..३९ वर्षांची रंगभूमीची परंपरा ! https://swabhimansatara.com/2026/worldtheaterday__shahukalamandir-satara/ https://swabhimansatara.com/2026/worldtheaterday__shahukalamandir-satara/#respond Fri, 27 Mar 2026 10:09:25 +0000 https://swabhimansatara.com/?p=909

गेल्या ३९ वर्षांपासून…हेच ते व्यासपीठ, जिथे कलाकार घडतात आणि रसिकांची मनं जिंकली जातात.

सातारा शहरात आधुनिक नाट्यगृहाची गरज ओळखून सातारा नगरपालिकेने दूरदृष्टी ठेवत या भव्य वास्तूची उभारणी केली. १८ सप्टेंबर १९८६ रोजी विधान परिषदेचे तत्कालीन सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते या कलामंदिराचे लोकार्पण करण्यात आले आणि सातारच्या सांस्कृतिक विश्वाला नवी दिशा मिळाली.

आधुनिक मेकअप रूम्स…
भक्कम रंगमंच…
आणि ९०० प्रेक्षकांची आसनक्षमता…

या सर्व सुविधांमुळे, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून कलाकार इथे येतात. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर…सर्वांसाठी हे एक हक्काचं व्यासपीठ बनलं आहे.

दरवर्षी इथे रंगतात ५० पेक्षा अधिक व्यावसायिक नाटके तसेच शालेय आणि महाविद्यालयीन कार्यक्रमांचीही मोठी रेलचेल एकांकिका, संगीत रजनी, कला स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी शाहू कलामंदिर सतत गजबजलेलं असतं.

उत्कृष्ट ध्वनी-प्रकाश व्यवस्था, स्वच्छता आणि नियोजन यामुळेच हे नाट्यगृह कलाकार आणि प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवतं. शाहू कलामंदिर केवळ एक इमारत नाही.तर साताऱ्याच्या सांस्कृतिक ओळखीचं हृदय आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/worldtheaterday__shahukalamandir-satara/feed/ 0 909
टॅक्स भरण्याचीशेवटची संधी ! 31 मार्च DEADLINE ! सविस्तर जाणून घ्या. https://swabhimansatara.com/2026/incometaxservises-31st-march-deadline/ https://swabhimansatara.com/2026/incometaxservises-31st-march-deadline/#respond Fri, 27 Mar 2026 07:43:08 +0000 https://swabhimansatara.com/?p=906

31 मार्च 2026 हा 2025-26 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे, आयकर आणि GST संदर्भातील काही महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक झाले आहे. अंतिम मुदत चुकवल्यास करदात्यांना व्याज आणि दंडाचा सामना करावा लागू शकतो.

त्यामुळे, शेवटच्या क्षणाची वाट न पाहता नागरिकांनी आपली टॅक्स चेकलिस्ट आत्ताच पूर्ण करणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम, कर-बचत गुंतवणुकीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडणाऱ्या करदात्यांना कलम 80C अंतर्गत PPF, ELSS, LIC यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून 1.5 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. तसेच, कलम 80D अंतर्गत आरोग्य विम्यावरही करसवलत उपलब्ध आहे. मात्र, 31 मार्चनंतर केलेली गुंतवणूक चालू आर्थिक वर्षासाठी ग्राह्य धरली जाणार नाही.

दुसरे म्हणजे, एडवांस टॅक्स भरणे आवश्यक आहे. जर करदात्यांची एकूण कर देय रक्कम 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यांनी आगाऊ कर भरला आहे का याची खात्री करावी. अन्यथा, कलम 234B आणि 234C अंतर्गत थकबाकीवर दरमहा 1 टक्के दराने व्याज लागू होऊ शकते.

तिसरे महत्त्वाचे काम म्हणजे GST कंपोझिशन स्कीम. लघु व्यवसायांनी पुढील आर्थिक वर्षासाठी या योजनेत सहभागी होण्यासाठी CMP-02 फॉर्म 31 मार्चपूर्वी भरावा. ही मुदत चुकल्यास, संपूर्ण वर्षासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.

याशिवाय, निर्यातदारांसाठी LUT दाखल करणे आवश्यक आहे. IGST न भरता निर्यात करण्यासाठी दरवर्षी नवीन लेटर ऑफ अंडरटेकिंग सादर करणे बंधनकारक आहे. 31 मार्चपूर्वी हे न केल्यास निर्यातीवरील करभार वाढू शकतो.

दरम्यान, मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये काही सणांमुळे बँका बंद असल्या तरी, ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहणार आहेत. त्यामुळे इंटरनेट बँकिंग, UPI किंवा इतर डिजिटल माध्यमांचा वापर करून कर भरणे शक्य आहे.

मात्र, तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी नागरिकांनी आपली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/incometaxservises-31st-march-deadline/feed/ 0 906
पोलीसांकडून एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न ,अनिल देसाई,संदीप मांडवे यांचा गंभीर आरोप… https://swabhimansatara.com/2026/anildesaisandeepmandve-attempting-to-carry-out-an-encounter-by-the-police/ https://swabhimansatara.com/2026/anildesaisandeepmandve-attempting-to-carry-out-an-encounter-by-the-police/#respond Thu, 26 Mar 2026 11:36:13 +0000 https://swabhimansatara.com/?p=902

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या सदस्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ नव्हे, तर ‘ऑपरेशन दरोडा’ राबवला, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी केला आहे.

साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दावा केला की, ही निवडणूक नसून एक मिशन होते. निवडणुकीपूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, मोबाईल जप्त केले आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही पोलिस अधिकारी “ऑपरेशन यशस्वी करून येतो” असे बोलत होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.

“आमच्यावर ३० वर्षांत एकही गंभीर गुन्हा नाही, पण या निवडणुकीसाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. कायद्याचे रक्षकच लोकशाहीची हत्या करत आहेत.”

याचवेळी त्यांनी आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांना एन्काऊंटरची भीती दाखवण्यात आली. जिल्हा परिषद इमारतीतच २५ ते ३० पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला.तसेच, या संपूर्ण प्रकरणामागे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला आहे.

“सत्तेसाठी पोलिसांचा वापर करून षडयंत्र रचण्यात आले. आम्हाला धमकावण्यात आले.”

दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पुन्हा राबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच, महाबळेश्वर न्यायालयाने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याची माहितीही त्यांनी दिली.

या प्रकरणामुळे साताऱ्यातील राजकारण तापण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत या वादाला आणखी रंग चढण्याची चिन्हे आहेत.

]]>
https://swabhimansatara.com/2026/anildesaisandeepmandve-attempting-to-carry-out-an-encounter-by-the-police/feed/ 0 902