#satarashivjayanti – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Wed, 18 Feb 2026 06:19:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #satarashivjayanti – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 १९ फेब्रुवारीला साताऱ्यात ‘जय शिवाजी जय भारत’ची भव्य पदयात्रा https://swabhimansatara.com/2026/shivjayanti-jay-bharat-padayatra-satara-city/ https://swabhimansatara.com/2026/shivjayanti-jay-bharat-padayatra-satara-city/#respond Wed, 18 Feb 2026 06:19:51 +0000 https://swabhimansatara.com/?p=773

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जय शिवाजी जय भारत’ या भव्य पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. सातारा नगरपालिका शहराच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती व सदस्यांनी नितिन तरळकर (जिल्हा क्रीडाधिकारी) यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत युवकांना पदयात्रेच्या नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.नितिन तरळकर यांनी सर्व युवकांना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता गांधी मैदान येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले. पदयात्रा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.या पदयात्रेस देशाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून साताऱ्यातील जवळपास दहा हजारांहून अधिक युवक या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.बैठकीला शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती व नगरसेवक शंकर किर्दत, नगरसेवक शंकर माळवदे तसेच नगरसेवक पंकज चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनाचा आढावा घेण्यात आला.सर्व सातारकर नागरिकांनी या भव्य व ऐतिहासिक पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सातारा जिल्ह्याचा गौरव वाढवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/shivjayanti-jay-bharat-padayatra-satara-city/feed/ 0 773