#ShivajiUniversity – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Tue, 23 Dec 2025 06:16:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #ShivajiUniversity – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ आजपासून प्रारंभ ; मुख्य दीक्षांत समारंभ बुधवार, दि. २४ डिसेंबर रोजी भारताचे अवकाश संशोधक डॉ. जी. सतीश रेड्डी प्रमुख पाहुणे ! https://swabhimansatara.com/2025/shivajiuniversity-62nd-convacationceremony-degreecertificate/ https://swabhimansatara.com/2025/shivajiuniversity-62nd-convacationceremony-degreecertificate/#respond Tue, 23 Dec 2025 06:16:45 +0000 https://swabhimansatara.com/?p=636

शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभास आजपासून ग्रंथदिंडी व ग्रंथमहोत्सवाने प्रारंभ सुरु झाला आहे. मुख्य दीक्षांत समारंभ बुधवार, दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असून संरक्षण व अवकाश संशोधक डॉ. जी. सतीश रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी असतील.

यंदा ४९,९०२ विदयार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार असून अक्षय नलवडे-जहागीरदार व आर्या देसाई यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे. दीक्षांत निमित्त ग्रंथदिंडी, दोन दिवसीय ग्रंथमहोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम व काव्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. पदवी प्रमाणपत्र वितरणासाठी क्यूआर कोड, स्टॉल व्यवस्था, पार्किंग व डीजी लॉकरवर प्रमाणपत्र अपलोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रंथमहोत्सवातील सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहेत. दीक्षांत समारंभाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात नामवंत भारतीय व परदेशी प्रकाशक, पुस्तक विक्रेते, डिजिटल ग्रंथ व डेटाबेसचे सुमारे ४० स्टॉल्स असणार आहेत. ग्रंथदिंडीचे उद्घाटन प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांच्या हस्ते होणार आहे.

विदयार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणासाठी क्यूआर कोड प्रणाली, स्टॉल व्यवस्था, पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीची सर्व पदवी प्रमाणपत्रे डीजी लॉकर व नॅड पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, दुपारी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सायंकाळी प्रख्यात कवी विसूभाऊ बापट यांचे विश्वविक्रमी एकपात्री काव्य सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.

]]>
https://swabhimansatara.com/2025/shivajiuniversity-62nd-convacationceremony-degreecertificate/feed/ 0 636