#shivendrasinghrajebhosale – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Thu, 26 Mar 2026 05:56:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #shivendrasinghrajebhosale – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 ४ एप्रिलला सत्तासंघर्ष ! ZP सभापती निवडीबाबत मोठा ट्विस्ट…! https://swabhimansatara.com/2026/zp-president-for-revealed-date-4-april/ https://swabhimansatara.com/2026/zp-president-for-revealed-date-4-april/#respond Thu, 26 Mar 2026 05:55:53 +0000 https://swabhimansatara.com/?p=894

सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा सत्तासंघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.चार सभापती पदांच्या निवडीकडे… आणि या निवडणुकीत पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ चर्चेत आले आहे.७ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. भाजपला २७, राष्ट्रवादीला २० तर शिंदेसेनेला १५ जागा मिळाल्या. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३३ सदस्यांच्या आकड्यापासून सर्वच पक्ष दूर होते.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र येऊन सत्ता स्थापनेची तयारी करत असताना, भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवत काही सदस्यांची साथ मिळवली… आणि सत्ता आपल्या बाजूने वळवली.

आता पुन्हा एकदा तसाच सत्तासंघर्ष सभापती निवडीच्या निमित्ताने पाहायला मिळणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. ४ एप्रिलला महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि इतर दोन विषय समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे. यासाठी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत.गरज भासल्यास दुपारी मतदान होणार असून, या वेळी सदस्यांना हात उंचावून मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे कोण कोणाच्या बाजूने उभा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भाजप पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’च्या तयारीत असल्याची चर्चा आहे… तर राष्ट्रवादी आणि शिंदेसेना भाजपला रोखण्यासाठी रणनीती आखत आहेत. त्यामुळे साताऱ्यातील ही निवडणूक ‘हाय टेन्शन’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

]]>
https://swabhimansatara.com/2026/zp-president-for-revealed-date-4-april/feed/ 0 894
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवत सत्ता अक्षरशः खेचून आणली आहे…. https://swabhimansatara.com/2026/what-really-happend-the-satara-zilha-parishad-election/ https://swabhimansatara.com/2026/what-really-happend-the-satara-zilha-parishad-election/#respond Sat, 21 Mar 2026 10:20:13 +0000 https://swabhimansatara.com/?p=875

सातारा राजकारणाचा सर्वात मोठा स्फोट झाला आहे ! जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवत सत्ता अक्षरशः खेचून आणली आहे. राष्ट्रवादीचे तीन आणि शिंदेसेनेचे दोन सदस्य फोडत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आणि सत्तेवर कब्जा केला.
सातारा जिल्हा परिषदेत एकूण ६५ जागा आहेत. निकालानंतर भाजप २७, राष्ट्रवादी २०, शिंदेसेना १५, तर काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येकी १ जागेवर विजयी झाले होते. एक अपक्ष सदस्य भाजपच्या बाजूने गेला होता. तरीही भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाच सदस्यांची गरज होती. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने एकत्र येत ३५ सदस्यांचे बहुमत तयार केले होते. ‘ऑपरेशन लोटस’च्या भीतीने त्यांनी आपल्या सदस्यांना महिनाभर सहलीवर नेले होते.
शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता सर्व सदस्य ट्रॅव्हल्समधून थेट जिल्हा परिषदेत दाखल झाले. परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण होते.
दरम्यान, गुरुवार रात्रीपासूनच भाजपने रणनीती आखत राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचे सदस्य फोडण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर पाच सदस्य भाजपच्या गळाला लागले आणि सत्तेचा गेम पूर्णपणे बदलला.
अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे विजयी – ३३ मते
उपाध्यक्षपदी राजू भोसले विजयी – ३३ मते विरोधी उमेदवारांना ३० मतांवर समाधान
या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट म्हणजे – कोरेगावचे शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपच्या तिकिटावर अध्यक्ष बनल्या.

मतदाना आधीच राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाई पोलिस ठाण्यातील तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही आणि याचा थेट परिणाम निकालावर झाला. निवडणुकीदरम्यान सभागृहात मोठा गोंधळ झाला. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. वातावरण इतकं तापलं की धक्काबुक्कीपर्यंत परिस्थिती गेल्याचं सांगितलं जात आहे.

याच गोंधळात पालकमंत्री देसाई यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांना बीपीचा त्रासही जाणवू लागला आणि तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या हाताला ड्रेसिंग करण्यात आलं.
साताऱ्यातील या नाट्यमय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ‘ऑपरेशन लोटस’ पुन्हा एकदा यशस्वी ठरलं आहे का? आणि याचे पुढील राजकीय परिणाम काय होणार? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/what-really-happend-the-satara-zilha-parishad-election/feed/ 0 875
साताऱ्यात सत्ता संघर्ष पेटला ! राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र, भाजपवर दबावाचा आरोप…. https://swabhimansatara.com/2026/satara-zp-power-struggles-bjp-is-pressure-for-rashtrawadi-shivsena/ https://swabhimansatara.com/2026/satara-zp-power-struggles-bjp-is-pressure-for-rashtrawadi-shivsena/#respond Fri, 20 Mar 2026 08:54:10 +0000 https://swabhimansatara.com/?p=870

साताऱ्यात सत्तासंघर्ष पेटला ! राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपवर दबाव टाकल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र भाजपकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेना – राष्ट्रवादीने आता नवा पर्याय स्वीकारला आहे.
आता राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे साताऱ्यात नव्या राजकीय युतीची चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केले :-

भाजप आमच्या सदस्यांवर दबाव टाकत असून दोन सदस्यांना आपल्या गोटात ओढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच काही सदस्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या सर्व घडामोडींमुळे साताऱ्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी काळात सत्तासमीकरण आणखी बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-zp-power-struggles-bjp-is-pressure-for-rashtrawadi-shivsena/feed/ 0 870
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६ : साताऱ्याच्या विकासासाठी ३५८ कोटींची मंजुरी शिवेंद्रराजेंचा मोठा विजय… https://swabhimansatara.com/2026/satara-maharshtra-budget-2026358-crore-development-for-satara-approved/ https://swabhimansatara.com/2026/satara-maharshtra-budget-2026358-crore-development-for-satara-approved/#respond Sat, 07 Mar 2026 11:32:21 +0000 https://swabhimansatara.com/?p=814

ऐतिहासिक साताऱ्याच्या विकासाला आता मोठी चालना मिळणार आहे. राज्य शासनाने सातारा जिल्ह्यासाठी सुमारे ३५८ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे संगम माहुली येथे महाराणी ताराबाई समाधी परिसराचा विकास आणि सुशोभीकरणासाठी १३३ कोटी रुपये, तर किल्ले अजिंक्यतारा सुशोभीकरण व संवर्धनासाठी १३५ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रकल्पांतर्गत अजिंक्यतारा किल्ल्यावरील राजसदर, बुरुज आणि तटबंदी दुरुस्ती, तसेच पर्यटकांसाठी सुविधा आणि अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था उभारली जाणार आहे.

तर संगम माहुली येथे महाराणी ताराराणी समाधी परिसर, नदी घाट, मंदिरांचे जतन आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.याशिवाय पर्यटन वाढीसाठी मुनावळे ते किल्ले वासोटा रोपवे, तसेच कराड विमानतळाचा विकास आणि नाईट लँडिंगची मंजुरी देखील देण्यात आली आहे.

या सर्व प्रकल्पांमुळे साताऱ्याच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून ऐतिहासिक वारसा जतन करण्यासही मदत होणार आहे.

दरम्यान, या मंजुरीबद्दल ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-maharshtra-budget-2026358-crore-development-for-satara-approved/feed/ 0 814
९९वे साहित्य संमेलन मोठ्या उत्सवात पार : समारोपाला सातारकरांनी फोक आख्यान दुमदुमवले… https://swabhimansatara.com/2026/%e0%a5%af%e0%a5%afthaakhilbhartiysahityasanmelan2029-thefolknarration/ https://swabhimansatara.com/2026/%e0%a5%af%e0%a5%afthaakhilbhartiysahityasanmelan2029-thefolknarration/#respond Mon, 05 Jan 2026 06:38:50 +0000 https://swabhimansatara.com/?p=740

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारी दरम्यान उत्साहात पार पडलं. साहित्य, संस्कृती आणि विचारांचा हा महाकुंभ चार दिवस रसिकांना प्रेक्षणीय केले.यामध्ये समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले, “शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीमध्ये ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाल्यानंतर आता १०० वे मराठी साहित्य संमेलन हे ‘न भूतो न भविष्यति’ असे व्हावे यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल आणि काहीही कमी पडू देणार नाही,

दरम्यान, साहित्य संस्थांमध्ये कोणताही राज्यकीय हस्तक्षेप नसेल आणि हिंदी सक्ती कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही. मराठी भाषेचाच मानसन्मान वाढवला जाईल, असा निर्वाळाही ना. एकनाथ शिंदे यांनी दिला.

या संमेलनात साहित्यिक मेळावे, कवी संमेलने, परिसंवाद, कथाकथन, पुस्तक प्रकाशन, मुलांसाठी विशेष कार्यक्रम, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक सादरीकरणांची रेलचेल पाहायला मिळाली.ज्येष्ठ साहित्यिकांसोबतच नव्या पिढीतील लेखक, कवी आणि विचारवंतांनी आपल्या शब्दांतून समाजातील विविध विषयांवर मते मांडली.

मराठी भाषेचे भविष्य, डिजिटल युगातील साहित्य, ग्रामीण व शहरी प्रश्न, स्त्री साहित्य, पर्यावरण आणि सामाजिक वास्तव यावर सखोल चर्चा झाली. ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, तर लहान मुलांसाठीच्या उपक्रमांनी संमेलनात रंगत आणली. चार दिवस चाललेल्या या साहित्यिक पर्वाने मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा वाचन, लेखन आणि विचारांची ज्योत पेटवली. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने मराठी साहित्याची ताकद आणि व्यापकता पुन्हा अधोरेखित केली.

सातारकरांना फोक आख्यान खूप गर्दी करून दुमदमले सातारकरांच्या फोक आख्यानांनी साहित्य संमेलन :

दुमदुमलं सातारकरांच्या फोक आख्यानांना प्रचंड गर्दी; पंडाल हाऊसफुल फोक आख्यानांच्या सादरीकरणाला सातारकरांचा उस्फूर्त प्रतिसाद….

लोककलेच्या तालावर संमेलन दुमदुमलं; सातारकरांची गर्दी

साताऱ्याच्या मातीतली लोककला आणि परंपरेचा ठसा उमटवणाऱ्या फोक आख्यानांनी साहित्य संमेलन अक्षरशः दुमदुमून टाकलं.सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक कथन, लोकसंगीत आणि सादरीकरणांनी मंत्रमुग्ध झाले.

“फोक आख्यान… आणि सातारकरांची तुफान गर्दी!”

“सातारकरांचा लोककलेला जल्लोष ,फोक आख्यानांनी पंडाल हाऊसफुल!”.

]]>
https://swabhimansatara.com/2026/%e0%a5%af%e0%a5%afthaakhilbhartiysahityasanmelan2029-thefolknarration/feed/ 0 740
सातारा ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटनप्रसंगी : मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा – मुख्यमंत्री फडणवीस https://swabhimansatara.com/2026/satara-aakhilbhartiysahityasanmelan2026/ https://swabhimansatara.com/2026/satara-aakhilbhartiysahityasanmelan2026/#respond Sat, 03 Jan 2026 08:05:56 +0000 https://swabhimansatara.com/?p=736

या संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी, मावळा फाऊंडेशन सातारा आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने करण्यात आले असून सध्या सुरू असलेल्या महानरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठीचा मुद्दा तापला आहे. त्यात मुंबईसारख्या प्रमुख महानगरपालिकेमध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून स्पष्ट संदेश दिला आहे.

अभिजात मराठीला राजमान्यता मिळाली आहे. आता लोकमान्यता मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात फक्त मराठी भाषाच सक्तीची राहणार आहे. अन्य कुठल्याही भाषेची सक्ती केली जाणारा नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले असून दिल्ली येथे पार पडलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे पदभार सुपूर्त केल्याच्या घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, “असं जर राजकारणातही चालत असतं, तर किती छान झालं असतं.” स्वराज्याच्या भूमीत असे आदर्शवत कार्य घडत असल्याबद्दल त्यांनी सारस्वतांना प्रणाम केला.

महाराष्ट्रातील साहित्य संस्थांमध्ये सरकारने कधीही हस्तक्षेप केला नाही आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत तो होणारही नाही. साहित्य क्षेत्रात राजकारण आणू नका, असा चिमटाही फडणवीस यांनी यावेळी काढला. भारतीय भाषांना विरोध करून विदेशी भाषांना पायघड्या का घातल्या जातात, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी लेखिका मृदुला गर्ग, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, आ. डॉ. अतुल भोसले, साहित्यनगराध्यक्ष आ. मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-aakhilbhartiysahityasanmelan2026/feed/ 0 736
साताऱ्यात उभारणार अत्याधुनिक CIIT सेंटर | रोजगार आणि कौशल्य विकासाला मोठी चालना https://swabhimansatara.com/2025/satara-ciit-centre/ https://swabhimansatara.com/2025/satara-ciit-centre/#respond Tue, 09 Dec 2025 12:11:12 +0000 https://swabhimansatara.com/?p=546

सातारा जिल्ह्यासाठी एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे.साताऱ्यात तब्बल ११५ कोटी रुपयांचे “सी-ट्रिपल-आयटी” – म्हणजेच सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि ट्रेनिंग – हे अत्याधुनिक आयटी कौशल्यविकास केंद्र उभारण्याला मंजुरी मिळाली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव टाटा टेक्नॉलॉजीजकडून राज्य शासनाला सादर करण्यात आला असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना अधिकृत पत्रही देण्यात आले आहे.

लिंब-खिंड, नागेवाडी इथे साकारत असलेल्या नवीन आयटी पार्कसोबत हे केंद्र जोडले जाणार असून, सातारा जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला असून, या केंद्रामुळे स्थानिक तरुणांना AI, उद्योग 4.0 आणि आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“टाटा टेक्नॉलॉजीजच्या या प्रकल्पामुळे साताऱ्यात तंत्रज्ञानाधारित कौशल्य विकासाची नवी दालने उघडणार असून स्थानिक तरुणांना अत्याधुनिक उद्योग तयार करण्यास मोठी मदत होणार आहे. त्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजला आवश्यक ते सहकार्य केले जात आहे. या प्रकल्पासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. – ना. शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री “

एकूण ११५ कोटी रुपयांच्या प्रकल्पात —
९७ कोटी ७५ लाख टाटा टेक्नॉलॉजीज देणार,
तर १७ कोटी २५ लाख राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहेत.
विशेष म्हणजे — राज्यावर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही.

कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम आणि चंद्रपूर-गडचिरोली येथे अशाच केंद्रांचे यशस्वी प्रयोग टाटा टेक्नॉलॉजीजने केले असून आता सातारा त्यांच्याच पंक्तीत सामील होत आहे. या केंद्रात अत्याधुनिक प्रयोगशाळा, नवीन तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण, अपडेटेड अभ्यासक्रम आणि उद्योगांना आवश्यक असे कौशल्य विकसित करण्याची संपूर्ण सुविधा मिळणार आहे.
दरवर्षी जवळपास ३,००० विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत.

साताऱ्याच्या उद्योगविश्वासाठी, तरुणांसाठी आणि तंत्रज्ञानाच्या भविष्यासाठी ही निश्चितच एक मोठी संधी ठरणार आहे. “सातारा… तंत्रज्ञानाच्या नव्या युगात प्रवेश करण्यासाठी सज्ज!”

साताऱ्यात तब्बल ११५ कोटी रुपयांचे अत्याधुनिक सी-ट्रिपल-आयटी केंद्र उभारण्याला हिरवा कंदील मिळाला आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजने सादर केलेल्या या महत्त्वाच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी मिळून साताऱ्यात इनोव्हेशन, इन्व्हेन्शन आणि कौशल्यविकासाचे नवे दालन उघडणार आहे.

लिंब-खिंड, नागेवाडी येथे तयार होत असलेल्या नवीन आयटी पार्कला या प्रकल्पामुळे मिळणार आहे आणखी बळ.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—साताऱ्यातील युवकांना AI, उद्योग 4.0 आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळा… नव्या तंत्रज्ञानावर प्रशिक्षण… अपडेटेड अभ्यासक्रम…
आणि दरवर्षी ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाची संधी!

कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, आसाम, चंद्रपूर–गडचिरोलीमध्ये यशस्वी ठरलेले टाटा टेक्नॉलॉजीजचे मॉडेल…
आता साताऱ्यातही उद्योगविकासाची नवी कहाणी लिहिणार आहे.

सातारा… नव्या तंत्रज्ञानक्रांतीकडे मोठी झेप!

]]>
https://swabhimansatara.com/2025/satara-ciit-centre/feed/ 0 546