#ShivParvti – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Fri, 27 Mar 2026 10:33:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #ShivParvti – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 शिंगणापूर यात्रा २०२६ शिवपार्वती विवाहसोहळा धुमधडाक्यात…… https://swabhimansatara.com/2026/shingnapuryatra2026/ https://swabhimansatara.com/2026/shingnapuryatra2026/#respond Fri, 27 Mar 2026 10:32:08 +0000 https://swabhimansatara.com/?p=912

सातारा जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर यात्रेत गुरुवारी भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळाला. मानाच्या पागोटे बांधण्याचा सोहळा आणि मध्यरात्री पार पडलेला शिवपार्वती विवाहसोहळा यामुळे संपूर्ण शिंगणापूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.

चैत्र शुद्ध अष्टमीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिंगणापूर यात्रेत मानाच्या पागोटे म्हणजेच ध्वज बांधण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दुपारपासूनच मानाच्या पागोट्यांचे शहरात आगमन झाले. पोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि हरहर महादेवच्या जयघोषात ही पागोटी शंभू महादेव मंदिरात आणण्यात आली. मंदिरात विधिवत पूजन केल्यानंतर, कोळी समाज बांधवांनी अत्यंत साहसाने आणि परिश्रमाने शंभू महादेव मंदिर ते अमृतेश्वर मंदिराच्या कळसापर्यंत मानाचे ध्वज बांधले.जवळपास दीड तास चाललेल्या या सोहळ्यावेळी लाखो भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि जयघोषात सहभाग घेतला.

दरम्यान, मध्यरात्री बारा वाजता पारंपरिक पद्धतीने शिवपार्वती विवाहसोहळा संपन्न झाला. सनई, चौघडा, ढोल-ताशांच्या मंगलमय सुरात, विष्णू-लक्ष्मीच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.
गुलाबी रंगाची उधळण, ज्वारीच्या अक्षता आणि मंगलाष्टकांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

फटाक्यांच्या आतषबाजीत आणि हरहर महादेवच्या जयघोषात लाखो भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. यात्रेनिमित्त पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस उपअधीक्षक रणजीत सावंत आणि सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, २९ आणि ३० मार्च हे यात्रेचे मुख्य दिवस असल्याने शिंगणापूर नगरीत भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण परिसर सध्या भक्तीमय वातावरणात फुलून गेला आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/shingnapuryatra2026/feed/ 0 912