#songaon – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Sat, 14 Mar 2026 11:49:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #songaon – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 सोनगाव कचरा डेपोत उसळलेला भीषण आग….ठेकेदारावर गुन्हा दाखल….४ दिवसांपासून धुमसतेय आग https://swabhimansatara.com/2026/songaon-garbage-fire-crime-case-registered/ https://swabhimansatara.com/2026/songaon-garbage-fire-crime-case-registered/#respond Sat, 14 Mar 2026 11:49:44 +0000 https://swabhimansatara.com/?p=831

सातारा शहरालगतच्या सोनगाव कचरा डेपोतील भीषण आगीच्या घटनेनंतर अखेर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आग लागल्याचा ठपका ठेवत इंदोरच्या इको सेव्ह कंपनीच्या संचालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनगाव कचरा डेपोमध्ये नऊ मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. सात एकर परिसरात पसरलेल्या कचऱ्याला लागलेली ही आग गेल्या चार दिवसांपासून धुमसत असून, अद्यापही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. या आगीमुळे सोनगाव आणि जकातवाडी परिसरातील नागरिकांना विषारी धुराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या प्रकरणी सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक राकेश गलीयल यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. असून, इंदोर येथील इको सेव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक पुनीत शिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, या गंभीर घटनेची दखल घेत नगरसेवक राजू गोरे, नगरसेविका मुक्ता लेवे आणि नगरसेविका सिद्धी पवार यांनी देखील कारवाईची मागणी केली होती.या घटनेमुळे पालिकेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

कचरा डेपोत यापूर्वीही आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र यावेळी लागलेली आग अत्यंत भीषण असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य आणि अग्निशमन विभागाची यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहे.

“हा प्रकार नागरिकांच्या जीविताशी खेळण्यासारखा आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित ठेकेदाराकडून वसूल केली जाईल.”

]]>
https://swabhimansatara.com/2026/songaon-garbage-fire-crime-case-registered/feed/ 0 831