#SPsatarapolice – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Tue, 24 Mar 2026 06:14:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #SPsatarapolice – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 साताऱ्यातील राजकीय राडा विधान भवनात ! पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून शिवसेना-भाजप आमनेसामने https://swabhimansatara.com/2026/satara-zp-dispute-case-in-the-vidhan-bhavan/ https://swabhimansatara.com/2026/satara-zp-dispute-case-in-the-vidhan-bhavan/#respond Tue, 24 Mar 2026 06:11:57 +0000 https://swabhimansatara.com/?p=883

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीचे पडसाद आता थेट विधान परिषदेत उमटले आहेत. या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात मोठी खडाजंगी पाहायला मिळत आहे.

शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत, साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

सदस्यांच्या मागणीची दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. मात्र, या निर्णयाने सभागृहात नव्या वादाला तोंड फुटले.भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि गटनेते प्रवीण दरेकर यांनी या निर्णयाला कडाडून विरोध करत, शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या वर्तनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतींचा निर्णय राखून ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, साताऱ्यातील या ऐतिहासिक राड्यानंतर घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे पडसाद थेट विधान भवनात उमटले. साताऱ्याच्या प्रतिमेवर झालेल्या परिणामामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.साताऱ्यातील या घटनेमुळे राज्यातील राजकारण आणखी ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत.

पुढे या प्रकरणात काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satara-zp-dispute-case-in-the-vidhan-bhavan/feed/ 0 883