#SushmaAndhare – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Thu, 18 Dec 2025 08:54:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #SushmaAndhare – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 बामनोली ड्रग्स प्रकरण : सुषमा अंधारे यांचे आरोपांवर शंभूराज देसाई यांचे प्रतिउत्तर.. https://swabhimansatara.com/2025/bambnoli-shambhurajdesai-sushmaandhare/ https://swabhimansatara.com/2025/bambnoli-shambhurajdesai-sushmaandhare/#respond Thu, 18 Dec 2025 08:54:36 +0000 https://swabhimansatara.com/?p=600

“आरोप तात्काळ मागे न घेतल्यास, या प्रकरणातही न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल ” मंत्री शंभूराज देसाई..

बामनोली परिसरातील ड्रग्स प्रकरणावरून शिवसेना (उभाठा) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावर केलेले आरोप पूर्णतः बिनबुडाचे व निवडणूकनिहाय राजकीय स्टंट असल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

केवळ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे देसाई यांनी म्हटले. एकनाथ शिंदे किंवा प्रकाश शिंदे यांचा या ड्रग्स प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आमची पूर्ण तयारी असून, केवळ बदनामीसाठी शिंदे साहेबांचे नाव घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन वर्षांपूर्वीच्या पुणे–नाशिक ट्रक प्रकरणाची आठवण करून देत, त्या प्रकरणात सुषमा अंधारे यांना पाटण न्यायालयात हजर राहावे लागले होते आणि आजही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान पाटण न्यायालयात प्रकरण सुरू असताना अशा प्रकारची वक्तव्ये करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, असा इशाराही देसाई यांनी दिला.

आरोप तात्काळ मागे न घेतल्यास, या प्रकरणातही न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2025/bambnoli-shambhurajdesai-sushmaandhare/feed/ 0 600