#Tourist – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Sat, 07 Mar 2026 09:26:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #Tourist – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 रंगपंचमीच्या दिवशी महाबळेश्वर शहर कडकडीत बंद : सुरूर–पोलादपूर राज्य महामार्ग रखडलेल्या कामामुळे आता महाबळेश्वरमध्ये नागरिकांचा संताप…. https://swabhimansatara.com/2026/womensday-and-rangpanchmi-mahableshwar-close-tourist/ https://swabhimansatara.com/2026/womensday-and-rangpanchmi-mahableshwar-close-tourist/#respond Sat, 07 Mar 2026 09:26:07 +0000 https://swabhimansatara.com/?p=810

सुरूर–पोलादपूर राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आता महाबळेश्वरमध्ये नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याच्या निषेधार्थ महिला दिन आणि रंगपंचमीच्या दिवशी महाबळेश्वर शहर बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

पहा नक्की काय घडलंय ?

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या सुरूर–पोलादपूर राज्य महामार्गाच्या रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. डिसेंबर २०२४ पासून सुरूर ते वाई या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, अनेक महिने उलटूनही काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पसरणी घाटातील मोऱ्या आणि संरक्षक भिंतींचे काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराने पाचगणी–महाबळेश्वर टप्प्यातील काम सुरू केल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. विशेषतः पाचगणी ते महाबळेश्वर या सुमारे वीस किलोमीटरच्या मार्गाची अवस्था अतिशय खराब झाली असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी पेटीट ग्रंथालय मैदानावर पक्षनिरपेक्ष नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत महिला दिन आणि रंगपंचमीच्या दिवशी महाबळेश्वर शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आंदोलनानंतरही रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही, तर बेमुदत शहर बंद आणि रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
यासोबतच सोमवारी नगरपालिका, तहसीलदार कार्यालय, वन विभाग, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस ठाणे येथील प्रमुख अधिकाऱ्यांना मोर्चा काढून नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
सुरूर–पोलादपूर महामार्गाच्या कामाला लवकर गती मिळते का आणि नागरिकांचा रोष शांत होतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/womensday-and-rangpanchmi-mahableshwar-close-tourist/feed/ 0 810
अमेरिका इराण युद्ध थेट पर्यटनावर फटका..! साताऱ्यातील परदेश सहली cancel…. https://swabhimansatara.com/2026/america-iran-attack-for-satara-tourist-cancel/ https://swabhimansatara.com/2026/america-iran-attack-for-satara-tourist-cancel/#respond Tue, 03 Mar 2026 09:47:35 +0000 https://swabhimansatara.com/?p=788

देशांमध्ये वाढलेल्या तणावामुळे जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्रायल कडून इराण वर सुरू असलेल्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिरता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील परदेश पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारकर पर्यटकांनी सर्व आंतरराष्ट्रीय सहली तूर्तास रद्द केल्या आहेत.सातारा जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक विदेशवारी करतात.
विशेषतः दुबई, व्हिएतनाम, श्रीलंका, कंबोडिया, भूतान आणि नेपाळ ही प्रमुख पसंतीची पर्यटनस्थळे आहेत.

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आगाऊ बुकिंग केले होते. मात्र, सध्याच्या जागतिक परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुमारे ३८ अधिकृत ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपल्या नियोजित सहली स्थगित केल्या आहेत.देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम सातारा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर होताना दिसत आहे.अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

साताऱ्यातील बहुतांश ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व आंतरराष्ट्रीय सहली पुढील आदेशापर्यंत रद्द केल्या आहेत.

1.आखाती देशांतील तणावाचा सातारकर पर्यटनावर परिणाम

2.साताऱ्यातून दुबईसह आंतरराष्ट्रीय टूर रद्द

3.प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य – ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

4.युद्ध निवळल्यानंतरच परदेशवारीचे नियोजन

5.पर्यटन क्षेत्राला आर्थिक फटका

ट्रॅव्हल्स चालकांच्या मते, “प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च आहे. परिस्थिती पूर्णपणे शांत झाल्यानंतरच सहली पुन्हा सुरू करण्यात येतील.”

]]>
https://swabhimansatara.com/2026/america-iran-attack-for-satara-tourist-cancel/feed/ 0 788
महाबळेश्वर पर्यटन स्थळी थंडीची हुडहुडी : पर्यटकांसह, शालेय सहलीमुळे नववर्षाच्या स्वागतासाठी गुलाबी थंडीत महाबळेश्वर फुलले..! https://swabhimansatara.com/2025/minimahableshwartourist2026newyear/ https://swabhimansatara.com/2025/minimahableshwartourist2026newyear/#respond Sat, 27 Dec 2025 08:47:06 +0000 https://swabhimansatara.com/?p=688

काय मग मंडळी नवीन वर्षी कुठे? फिरायला जाण्याचा प्लान करत आहात. आपल्या सातारच्या मिनी काश्मीरला म्हणजेच महाबळेश्वरला फॅमिलीसोबत प्लान असेल तर नक्कीच हि माहिती तुमच्या साठी महत्वाची आहे. पाहूयात खालीलप्रमाणे महाबळेश्वर पर्यटन स्थळी थंडीची हुडहुडी सह पर्यटकांची रेलचेल वाढली, पर्यटकांसह, शालेय सहलीमुळे महाबळेश्वर मध्ये तोबा गर्दी.

सध्या नाताळ मुळे गुलाबी थंडी साठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर पर्यटन स्थळ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.पर्यटकांची देखील चांगलीच रेलचेल वाढले असून महाबळेश्वर, पाचगणी या वर्ल्ड हेरिटेज पर्यटन स्थळ हे पर्यटकांनी भरण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातून नव्हे तर विविध राज्यांमधून लाखो पर्यटन या थंड हवेच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देत आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर नगरीमध्ये येऊ लागले आहेत. आणि या गुलाबी थंडीचा आनंद घेऊ लागले आहेत. महाबळेश्वर मधील बाजारपेठा या गजबजल्या आहेत.

दरम्यान, महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरात पर्यटक नौकाविहाराचा आनंद घेताना दिसत आहेत.
एकूणच नाताळ–नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटन हंगाम सध्या तेजीत असून पर्यटकांचा उत्साह वाढताना आपल्याला पाहायला मिळताना दिसत आहेत .

]]>
https://swabhimansatara.com/2025/minimahableshwartourist2026newyear/feed/ 0 688