#UdayanrajeBhosale – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Thu, 08 Jan 2026 07:18:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #UdayanrajeBhosale – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 सातारा जिल्हा परिषद निवडणुकीआधीच :महायुतीतील समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत..! https://swabhimansatara.com/2026/satarazp-election-noticket/ https://swabhimansatara.com/2026/satarazp-election-noticket/#respond Thu, 08 Jan 2026 07:18:53 +0000 https://swabhimansatara.com/?p=764

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत राजकारण तापताना दिसत आहे. आमदारांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन ,प्रत्येक आमदारांनी स्वताच्या मतदार संघासाठी निर्णय घ्यावेत. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री उपस्थित होते.

महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्यांना थेट इशारा देत. आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे, लोकसभेला खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आणि विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट दिलं जाणार नाही, असा ठाम इशारा आमदार महेश शिंदे यांनी दिला आहे.

जिल्हा परिषद निवडणूक महायुतीमधून एकत्र लढण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत आमचं ट्युनिंग उत्तम असून, लोकसभा आणि विधानसभेला आम्ही एकत्र बसून प्रामाणिकपणे काम केलं असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

ज्यांनी निष्ठेने महायुतीसाठी काम केलं, अशा कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचा आमचा आग्रह राहील.मात्र, पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांसाठी महायुतीत कोणतीही जागा नसेल, असा स्पष्ट संदेश आमदार महेश शिंदे यांनी दिला आहे.

या इशाऱ्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महायुतीतील समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satarazp-election-noticket/feed/ 0 764
२२ वर्षांनंतर ऑक्सफर्डची माफी : छत्रपती शिवरायांबाबत चूक मान्य..! साताऱ्यातील उदयनराजे भोसले यांची मागितली माफी …. https://swabhimansatara.com/2026/22years-oxfordpress-udayanrajebhosale-forgiveness/ https://swabhimansatara.com/2026/22years-oxfordpress-udayanrajebhosale-forgiveness/#respond Wed, 07 Jan 2026 09:56:49 +0000 https://swabhimansatara.com/?p=756

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक आणि चुकीचे लेखन केल्याप्रकरणी अखेर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने माफी मागितली आहे. तब्बल २२ वर्षांच्या संघर्षानंतर छत्रपती शिवरायांचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांची लेखी माफी मागण्यात आली आहे. अमेरिकी लेखक जेम्स लेन लिखित ‘Shivaji: Hindu King in Islamic India’ या पुस्तकावरून हा वाद पेटला होता.


अमेरिकी लेखक जेम्स लेन याच्या ‘शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. या मजकुराविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन झाले होते. अखेर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने या प्रकरणात माफी मागत आपली चूक मान्य केली आहे.


ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे की, “या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ३१, ३३, ३४ आणि ९३ वरील काही विधाने पडताळणी न करता प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे जनभावना दुखावल्या गेल्या, याबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटते. खासदार उदयनराजे भोसले आणि जनतेची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.” हा माफीनामा म्हणजे इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांविरोधात सातारकरांनी दिलेल्या दीर्घ लढ्याचा मोठा विजय मानला जात आहे. या निर्णयाचे साताऱ्यातील शिवप्रेमींनी स्वागत केले आहे.


“जेम्स लेनच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि माँ साहेब जिजाऊ यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याविरोधात आम्ही न्यायालयात गेलो होतो. सुनावणीदरम्यान प्रकाशन संस्थेने माफी मागण्याची तयारी दर्शवली. अखेर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने लेखी माफी दिली आहे.”


२२ वर्षांनंतर मिळालेला हा न्याय ऐतिहासिक ठरत असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी लढणाऱ्यांच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2026/22years-oxfordpress-udayanrajebhosale-forgiveness/feed/ 0 756
कराडला शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाची मध्यरात्री घेतली गळाभेट ; भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंना आनंदाश्रू…. https://swabhimansatara.com/2025/karadnagaradyaksh-udaynrajebhosale-aandaashru/ https://swabhimansatara.com/2025/karadnagaradyaksh-udaynrajebhosale-aandaashru/#respond Wed, 31 Dec 2025 08:36:26 +0000 https://swabhimansatara.com/?p=719

भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपला मित्र नगराध्यक्ष झाल्याने आनंदाश्रू आवरता आले नाहीत… कराड नगरपालिकेत शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या युतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना यांची मध्यरात्री गळाभेट घेताना भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

सातारा जिल्ह्यात कराडचे राजेंद्रसिंह यादव आणि विजय यादव हे दोन्ही बंधू उदयनराजेंचे मित्र असल्याची माहिती आहे. परंतु नगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध या बंधूंमध्ये सामना रंगल्याने खासदार उदयनराजे या निवडणुकीपासून लांब होते.

मात्र आपला मित्र नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच मध्यरात्री करायला येत. उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच मध्यरात्री कराडमध्ये येत मित्राला अनोख्या शुभेच्छा..!
“पार्टी पाहिजे… पार्टी पाहिजे” असे म्हणत अनोख्या शब्दांत शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या डोळ्यांत भावुक आनंदाश्रू स्पष्टपणे पाहायला मिळाले. मित्राला अनोखे शुभेच्छा देत पार्टी पाहिजे पार्टी असे उदयनराजे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळत आहेत… भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या शिवसेना शिंदेंच्या नगराध्यक्षाची भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतलेली गळाभेट.

कराडच्या राजकारणात मैत्री, भावना आणि राजकीय समीकरणांचा हा अनोखा संगम याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता राज्यभर चांगलीच चर्चेत येणार आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2025/karadnagaradyaksh-udaynrajebhosale-aandaashru/feed/ 0 719