#ZPSatara – Swabhiman Satara https://swabhimansatara.com News Portal Thu, 26 Mar 2026 05:56:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.4 https://i0.wp.com/swabhimansatara.com/wp-content/uploads/2025/05/cropped-3-2-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 #ZPSatara – Swabhiman Satara https://swabhimansatara.com 32 32 250374832 ४ एप्रिलला सत्तासंघर्ष ! ZP सभापती निवडीबाबत मोठा ट्विस्ट…! https://swabhimansatara.com/2026/zp-president-for-revealed-date-4-april/ https://swabhimansatara.com/2026/zp-president-for-revealed-date-4-april/#respond Thu, 26 Mar 2026 05:55:53 +0000 https://swabhimansatara.com/?p=894

सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा सत्तासंघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.चार सभापती पदांच्या निवडीकडे… आणि या निवडणुकीत पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ चर्चेत आले आहे.७ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. भाजपला २७, राष्ट्रवादीला २० तर शिंदेसेनेला १५ जागा मिळाल्या. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३३ सदस्यांच्या आकड्यापासून सर्वच पक्ष दूर होते.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र येऊन सत्ता स्थापनेची तयारी करत असताना, भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवत काही सदस्यांची साथ मिळवली… आणि सत्ता आपल्या बाजूने वळवली.

आता पुन्हा एकदा तसाच सत्तासंघर्ष सभापती निवडीच्या निमित्ताने पाहायला मिळणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. ४ एप्रिलला महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि इतर दोन विषय समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे. यासाठी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत.गरज भासल्यास दुपारी मतदान होणार असून, या वेळी सदस्यांना हात उंचावून मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे कोण कोणाच्या बाजूने उभा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भाजप पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’च्या तयारीत असल्याची चर्चा आहे… तर राष्ट्रवादी आणि शिंदेसेना भाजपला रोखण्यासाठी रणनीती आखत आहेत. त्यामुळे साताऱ्यातील ही निवडणूक ‘हाय टेन्शन’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

]]>
https://swabhimansatara.com/2026/zp-president-for-revealed-date-4-april/feed/ 0 894
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीआधीच :महायुतीतील समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत..! https://swabhimansatara.com/2026/satarazp-election-noticket/ https://swabhimansatara.com/2026/satarazp-election-noticket/#respond Thu, 08 Jan 2026 07:18:53 +0000 https://swabhimansatara.com/?p=764

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत राजकारण तापताना दिसत आहे. आमदारांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन ,प्रत्येक आमदारांनी स्वताच्या मतदार संघासाठी निर्णय घ्यावेत. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री उपस्थित होते.

महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्यांना थेट इशारा देत. आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे, लोकसभेला खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आणि विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट दिलं जाणार नाही, असा ठाम इशारा आमदार महेश शिंदे यांनी दिला आहे.

जिल्हा परिषद निवडणूक महायुतीमधून एकत्र लढण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत आमचं ट्युनिंग उत्तम असून, लोकसभा आणि विधानसभेला आम्ही एकत्र बसून प्रामाणिकपणे काम केलं असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

ज्यांनी निष्ठेने महायुतीसाठी काम केलं, अशा कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचा आमचा आग्रह राहील.मात्र, पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांसाठी महायुतीत कोणतीही जागा नसेल, असा स्पष्ट संदेश आमदार महेश शिंदे यांनी दिला आहे.

या इशाऱ्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महायुतीतील समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

]]>
https://swabhimansatara.com/2026/satarazp-election-noticket/feed/ 0 764
सातारा जिल्हा परिषद देशभर चर्चेत : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या कामगिरीचे पंतप्रधानांकडून विशेष कौतुक…. https://swabhimansatara.com/2025/satarazp-ceoyashninagrajanpm-modi-appreciation/ https://swabhimansatara.com/2025/satarazp-ceoyashninagrajanpm-modi-appreciation/#respond Tue, 30 Dec 2025 08:52:24 +0000 https://swabhimansatara.com/?p=709

पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सातारा जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या कामगिरीचे पंतप्रधानांकडून विशेष कौतुक.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिल्हा परिषदेने राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण योजना आणि प्रशासनातील बदलांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या या सादरीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून सातारा जिल्ह्यात विकासाचा वेग वाढला आहे. दुर्गम भागांना प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत असून मॉडेल स्कूल, मॉडेल अंगणवाडी, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे यांसारख्या योजनांची राज्य शासनाने दखल घेतली असून हे उपक्रम आता राज्यभर राबवले जात आहेत.याशिवाय जिल्ह्यात महिला बचत गटांची चळवळ वेगाने वाढवण्यात आली असून, या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे काम सातारा जिल्हा परिषद करत आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जात आहे. केरळमधील कोवलम येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत याशनी नागराजन यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेत डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन व शासकीय सेवांमध्ये होणाऱ्या बदलांवर सखोल चर्चा करण्यात आली.

तसेच कर्नाटकातील बेंगलुरू येथे नीती आयोगाच्या राष्ट्रीय कार्यशाळेत सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर विषयावर सादरीकरणासाठी त्यांना प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रण देण्यात आले होते. नवी दिल्लीतील पुसा येथे २६ ते २८ डिसेंबरदरम्यान आयोजित पाचव्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषदेतील सादरीकरणातूनही सातारा जिल्हा परिषदेचे नाव देशभर पोहोचले आहे.पायाभूत सुविधा, सीएसआर निधीचा वापर, गुणवत्ता वाढ, सुरक्षा, क्रीडा, सौर ऊर्जा आणि शाळांची पटसंख्या वाढ यासंदर्भातील माहिती स्लाईडशोद्वारे सादर करण्यात आली.

या सर्व सादरीकरणांमुळे सातारा जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची नोंद थेट राजधानी दिल्लीत घेण्यात आली असून, सातारा जिल्ह्याचा नावलौकिक पुन्हा एकदा देशभर पसरला आहे.

]]>
https://swabhimansatara.com/2025/satarazp-ceoyashninagrajanpm-modi-appreciation/feed/ 0 709