
माळशिरस तालुक्यातील मौजे लवंग येथे शिवसेना तालुका उपप्रमुख तानाजी भोळे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांचेसह गणेश खंडागळे, आदम पठाण, दिगंबर साठे, मयूर मदने, नंदकुमार काळे आदी कार्यकर्ते यांचा तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. दरम्यान सपकाळ बोलताना म्हणले, दादासाहेब लोखंडे यांच्या पक्षप्रवेशामुळे तालुक्यामध्ये शिवसेनेची राजकीय ताकद निर्माण होणार असून ही ताकद येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. तसेच मित्रपक्षाने आम्हाला विश्वासात न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे प्रतिपादन देखील करण्यात आले.यावेळी रामचंद्र सावंत पाटील, अँड सोमनाथ वाघमोडे, सोनु पराडे पटील, बहानाप्पा सालगुडे, महादेव तुपसौंदर, तानाजी भोळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.दरम्यान महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा शिवसेनेचे नेते माननीय नामदार भरतशेट शेट गोगावले रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असताना पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अधिकृतपणे शिवसेनेत जाहीर प्रवेश करत यावेळी मा. दादासाहेब लोखंडे याचा सन्मान करण्यात आला. यावेळी माळशिरस तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते