
सातारा – खटाव तालुक्यातील पुसेगाव-फलटण मार्गावरील वेटण ओढ्यावर पूल नसल्याने काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा ओढ्यात साचल्याने साठवलेला कांदा छाती इतक्या पाण्यातून बाहेर काढावा लागतो आहे. शेतकऱ्यांनी १४ मजुरांच्या मदतीने प्रति पिशवी ९० रुपये खर्च करून ४०० फूट अंतरावरून कांदा बाहेर काढला. मजुरांनी जीव धोक्यात घालून मदत केल्याचे समाधान असले तरी कांद्याला दर न मिळाल्याने नाराजी आहे.या भागात पाणी अडथळ्यामुळे यंत्र किंवा बैलांच्या मदतीने शेती करणे अशक्य असून, शेतकरी हातानेच पेरणी करत आहेत. त्यामुळे वेटण ओढ्यावर किमान साकव पूल तरी बांधावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.