मे खडा तो नगरपालिकेसे बडा, भावी नगरसेवकाची स्वप्न पडणाऱ्या भाईंची पोवई नाक्यावर भाईगिरी

साताऱ्यातील विलासपूर परिसरात राहत असणाऱ्या जिल्हापरिषदेच्या ठेकेदाराला सातारा नगरपालिकेचे स्वप्न पडत आहेत. भावी नगरसेवक म्हणत संपूर्ण सातारा शहरात काळया रंगाची मोठी गाडी घेऊन फिरत आहेत. या भावी नगरसेवक “भाईंचा” वाढदिवस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भाईंच्या आजूबाजूला चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विलासपूर सह सातारा शहरातील मुख्य चौकांमध्ये भावी नगरसेवक भाईंचे बॅनर्स लागायला सुरुवात झाली आहे.यामध्ये अजब म्हणजे सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या छ. शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या शिवतीर्थ पोवई नाका परिसरात पावित्र्य राखण्यासाठी सातारा पालिकेने नो बॅनर झोन म्हणजे या संपूर्ण परिसरात बॅनर्स लावण्यास सक्त मनाई आहे. परंतू सातारा शहरातील विलासपूर या ठिकाणी राहत असलेल्या भावी नगरसेवकाची स्वप्न पडत असलेल्या “भाईंना” नगरसेवक होण्याच्या अगोदरच सूर्यवंशम चित्रपटातील एका डायलॉग प्रमाणे मे खडा तो नगरपालिके से बडा..! असे वाटत आहे. भाईंनी चक्क बॅनरचा परवाना न काढता, शिवतीर्थ पोवई नाका परिसरातील नो बॅनर झोन मध्येच वाढदिवसाचा बॅनर लावला आहे. त्यामुळे सातारकर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, बॅनर सह भाईंवर कारवाई व्हावी अशी मागणी सातारकर नागरिक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *