खा. उदयनराजे भोसले मित्र समुह अध्यक्ष संग्राम बर्गे यांच्यावतीने निडर कर्तृत्ववान उमेश खंडागळे यांचा सत्कार

साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर एका माथेफिरूने चाकू गळ्याला लाऊन प्रेमवीराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणात मुलाचा हल्यातून धाडस दाखवत त्या मुलीला उमेश खंडागळे, अमोल इंगोले, पोलीस कर्मचारी श्री. सागर निकम व श्री. धीरज माने यांनी प्रसंगावधान दाखवून त्या मुलीचा जीव वाचवला व सुटका केली. आज या तिन्ही रिअल हिरोंचे साताऱ्यात कौतुक होत आहे. दरम्यान खा. छ. उदयनराजे भोसले मित्र समुह अध्यक्ष संग्राम दादा बर्गे यांच्या वतीने धाडसी कर्तृत्वान उमेश खंडगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश जाधव, अभिजित बाटक्के, किरण कांबळे, आशुतोष खरे, सौरभ सुपेकर, धनेश खुडे, ऋषी डांबे, चिराग कोटक आणि सहकारी मित्र उपस्थित होते.

उमेश खंडागळे यांनी या संपूर्ण प्रकरणात त्या माथेफिरू प्रेमवीर मुलाच्या मागून पकडून माथेफिरू मुलापासून मुलीचा बचाव केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे धाडसी कर्तृत्वान निडर उमेश खंडागळे यांचे सातारा शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुकांचा वर्षाव होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *