
भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी वाईमध्ये एका कार्यक्रमात मंत्री मकरंद पाटील यांच्या कट्टर विरोधक असलेल्या मदन भोसले यांच्या कन्या सुरभी ताई यांच्या पाठीमागे उभे राहा असं कार्यकर्त्यांना आव्हान केला आहे.. जिल्ह्यावर काम करणारे सुरभी ताईंचे नेतृत्व आहे. विधानसभा, लोकसभा मध्ये पुनर्रचना होणार.त्यामध्ये महिलांना आरक्षण येणार आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महिलांचे महत्त्व वाढणार असल्याचे देखील यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितला आहे. त्यामुळे वाई तालुक्याला त्याचबरोबर जिल्ह्याला यांच्या कुटुंबाने दिशा देण्याचे काम केलं त्यामुळेच ताईंना सुद्धा या तालुक्याचा आशीर्वाद मिळावा, आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरभी ताईंच्या मागे आहोत आणि तुम्ही देखील त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा असं कार्यकर्त्यांना सांगितले आहे..
मंत्री शिवेंद्रराजे यांच्या विधानामुळे सुरभी भोसले आगामी वाई विधानसभा लढवणार काय अशी चर्चा देखील आता सुरू झाले आहे .त्यामुळे सातारा महायुतीतील दोन मित्र पक्षांमधील मंत्र्यांमध्ये जुंपनार असे म्हटलं जातं आहे..