
राज्यभरातील नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीचा निकाल एकत्रितपणे २१ डिसेंबर रोजी लागणार आहे.दोन डिसेंबरला पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आजवर लांबणीवर होते… अनेक ठिकाणी मतदान व्हायचे आहे. आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे या निकालांना नवीन तारीख मिळाली आहे.
२० डिसेंबरपर्यंत राज्यभर आचार संहिता लागू राहणार असून… एक्झिट पोलवर देखील पूर्ण बंदी राहणार आहे.साताऱ्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीत ताणतणावाच्या वातावरणात ६० टक्के मतदान पार पडलं आहे.
एकूण १७८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता ईव्हीएम यंत्रात बंद झाले आहे. आणि मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.मतदानाच्या दिवशी साताऱ्यातील अनेक केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी, रांगा आणि चांगला उत्साह पाहायला मिळाला… तरीही गतवर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का कमी झाल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, साताऱ्यातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये ईव्हीएम मशीन बदलण्यात आलं, याकडेही मतदार आणि उमेदवारांचे विशेष लक्ष केंद्रित होतं.
आता सर्वांचे डोळे २१ डिसेंबरकडे…
कोण ठरणार नगराध्यक्ष? कोणत्या पक्षाचा पारडं जड?
हे सर्व निकालच ठरवणार आहेत.