
साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.मुंबई क्राईम ब्रँचला मिळालेल्या माहितीच्या आधारे, या ठिकाणी असलेल्या एका शेडवर छापा टाकण्यात आला.या शेडमध्ये कोठ्याऐवजी बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणात तीन कारागीर आणि एक जण, असे एकूण चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.येथून पुणे आणि मुंबईकडे वाहतूक केली जात असल्याची माहितीही समोर आली आहे.
सध्या घटनास्थळी पोलिसांचा अधिक तपास सुरू असून, प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली आहे.
एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक ड्रग्स रॅकेटप्रकरण प्रकरण समोर आले आहे.एक आठवड्यापूर्वी मुंबईत दोन युवकांना पोलिसांनी अटक केली होती.या दोघांकडून चौकशीतून मुंबई, ठाणे आणि पुणे या ठिकाणांमधील ड्रग्स कनेक्शन उघड झाले.पुण्यातील एका व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला साताऱ्यातील सावरी गावाचा धागा मिळाला.
साताऱ्यातील सावरी गावात एमडी ड्रग्स तयार केले जात असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सावरी गावातील एका शेतामध्ये असलेल्या म्हशीच्या गोठ्यामध्ये एमडी ड्रग्स तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती.या ठिकाणी तिघेजण एमडी ड्रग्स तयार करत असल्याचे समोर आले आहे.मुंबई क्राइम ब्रँचच्या पोलिसांनी या कारवाईत दहा किलोहून अधिक एमडी ड्रग्स जप्त केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणात पुण्यातील विशाल मोरे या व्यक्तीने सावरी गावातील ओंकार दिघे यांच्याकडून ही जागा ड्रग्स तयार करण्यासाठी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.विशेष म्हणजे, ही जागा सुगंधित हुक्का तयार करण्यासाठी असल्याचे कारण देत घेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या ठिकाणी पकडण्यात आलेले सर्व आरोपी मुस्लिम समाजातील असून, एमडी ड्रग्स तयार करणारे कारागीर हे बांगलादेशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच हे कारागीर पश्चिम बंगालमधील असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास मुंबई क्राइम ब्रँचकडून सुरू असून, आणखी कोणकोणती नावे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.