एपिस्टन फाईल्समुळे देशात खळबळ : “पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा मंत्र्यांपासून उद्योगपतींपर्यंत नावे चर्चेत”

एपिस्टन फाईल्स… देश-विदेशात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणाबाबत आज मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. अमेरिकेत ही माहिती आज सकाळी उघड होणार असून, भारतात ती मध्यरात्रीनंतर समोर येईल, असा दावा त्यांनी केला आहे.

एपिस्टन फाईल्स ओपन झाल्यानंतर भारतात राजकीय धमाका होईल आणि मराठी माणूस पंतप्रधान होणार असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. शुक्रवारी त्यांनी हा दावा पुन्हा एकदा ठामपणे मांडला आहे.पत्रकारांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,अमेरिकेत सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान ही माहिती जाहीर होण्यास सुरुवात होईल.
याचा अर्थ, भारतात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साधारण एक वाजेच्या सुमारास ही माहिती उपलब्ध होईल.


पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मोठे नावं घेतली आहेत.त्यांच्या मते, भारताचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी, तसेच माजी खासदार आणि उद्योगपती अनिल अंबानी यांची नावेही या इलेक्ट्रॉनिक मेल्स असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


ते पुढे म्हणाले की,कॉम्प्रोमायझिंग फोटोग्राफ्स सापडले आहेत की नाहीत, याचा शोध अद्याप सुरू आहे.आंबेडकर मीडिया तसेच भारतातही या डेटाचा अभ्यास केला जात आहे. वीस दिवसांपूर्वी कराडमध्ये आपण ही माहिती दिली होती,
त्यानंतर संपूर्ण देशात एपिस्टन फाईल्सवर चर्चा सुरू झाली,आणि आपल्यावर आरोपही झाले, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.


मात्र एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे – देशाला एपिस्टन फाईल्स म्हणजे काय हे समजले, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. एपिस्टन फाईल्स हा अमेरिकेच्या संसदेच्या कायद्याअंतर्गतचा विषय आहे. अमेरिकेचे कायदे अतिशय कडक असल्यामुळे ही माहिती बाहेर येण्यापासून जगातील कोणतीही ताकद थांबवू शकत नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.


या फाईल्समध्ये तब्बल ३०० जीबी डेटा असल्याचं त्यांनी सांगितलं. हा डेटा डाउनलोड आणि तपासायला किती वेळ लागेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. माहिती अधिकृतपणे उपलब्ध झाल्यानंतर आपण यावर सविस्तर भूमिका मांडू, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे –
आज रात्री उघड होणाऱ्या एपिस्टन फाईल्सकडे…
खरंच राजकीय भूकंप होणार का?
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *