संकेत साठे याचा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या वतीने सत्कार ; साताऱ्याच्या राजकारणात शिंदे गटाचा प्रवेश..

सातारा शहराच्या राजकारणामध्ये खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे राजकारण नियमित वर चढ ठरलेले आपणास पाहायला मिळत आहे. पण यंदा पालिकेत प्रथमच कमळ फुलले असले तरी एक नगरसेवकाच्या निमित्ताने का होईना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पालिकेच्या राजकारणामध्ये चंचू प्रवेश मिळवला आहे .

शहरातल्या या बदलत्या राजकारणाची निश्चितच दखल घ्यायला हवी .संकेत संजय साठे यांनी धनुष्यबाण चिन्हावर बाराशे 69 मते मिळवून येथे तुतारी वाजवणाऱ्या दयानंद नागटिळक यांचा पराभव केला .या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवारच दिला नव्हता .खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असणारे संजय साठे यांचा सदर बाजार परिसरामध्ये मोठा जनसंपर्क आहे तोच वारसा त्यांची चिरंजीव संकेत साठे यांनी जपला आहे .येथे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत मिलिंद काकडे उमेदवार होते मात्र ऐनवेळी चर्चेत त्यांचे नाव मागे पडले .संकेत साठे यांनी थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे धनुष्यबाण स्वीकारून आणलेली प्रशंसा यशस्वी ठरली आणि त्यांनी नगरपालिकेत येण्याचा यशस्वी लक्षभेद केला .

सातारा नगरपालिकेमधील या एकमेव शिंदे गटाच्या नगरसेवकाचा पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्रीशंभुराजे देसाई यांनी त्यांच्या पोवई नाक्यावरील कोयना दौलत या निवासस्थानी विशेष सत्कार केला संकेत साठे यांनी नगरसेवक म्हणून “सातारा शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे जनतेच्या हितासाठी काम करावे” अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या यावेळी बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज दादा देसाई हे सुद्धा उपस्थित होते .यशराज देसाई यांनी सुद्धा संकेत साठे यांना शुभेच्छा देऊन सातारा नगरपालिकेत शिवसेनेचा बाणा कायम ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना केल्या यावेळी सातारा जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रंजीत सिंह भोसले युवा सेनेचे संभाजी पाटील तसेच इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

🚨संकेत साठे यांच्या कामगिरीकडे राहणार लक्ष :

संकेत साठे हे तरुण आणि तडफदार नगरसेवक असून त्यांचा सदर बाजार येथे मोठा कार्यकर्त्यांचा गोतावळा आहे. त्यांची ही निवडणूक प्रभागातील जनतेने हातात घेऊन त्यांना थेट नगरसेवक पदावर बसवले आहे .

दरम्यान प्रभाग क्रमांक.२ मध्ये पायाभूत सुविधा आणि तसेच वैशिष्ट्यपूर्ण विकास योजना लागू करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे ध्येय त्यांच्यासमोर असणार आहे .सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत .त्यामुळे सातारा पालिकेतल्या या एकमेव शिवसेनेच्या शिलेदाराला ताकद देण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर आता राहणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *