
९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा शहरातील शाहू स्टेडियम येथे १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी
आणि मावळा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन होत असून या चार दिवसांत साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी कुंभमेळा रसिकप्रेकक्षकांसाठी असणार आहे.
संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते तर समारोप ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.गुरुवार, १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने संमेलनाचा शुभारंभ होणार आहे. सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी सातारा शहरातून भव्य ग्रंथदिंडी निघणार असूनयावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील,पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची उपस्थिती असणार आहे.
शुक्रवार, २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मंडप क्रमांक १ येथे ज्येष्ठ लेखिका डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचे औपचारिक उद्घाटन होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत, स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, उद्योजक फरोख कुपर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. रात्री ८ वाजता प्रशांत दामले अभिनित आणि गौरी थिएटर्स निर्मित ‘शिकायला गेलो एक’ हे नाटक रसिकांचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
शनिवार, ३ जानेवारी रोजी सकाळी कथाकथन,दुपारी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त अनुराधा पाटील यांची विशेष मुलाखत, त्यानंतर ज्येष्ठ लेखक आणि प्रकाशकांचा सन्मान सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ‘आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता’
या विषयावर परिसंवाद आणि रात्री लोकप्रिय ‘हास्यजत्रा’ कलाकारांचा धमाल कार्यक्रम रंगणार आहे.
रविवार, ४ जानेवारी रोजी ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या पुस्तकावर चर्चा, त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांचा विशेष संवाद,दुपारी कविसंमेलन आणि विविध विषयांवरील परिसंवाद होणार आहेत. दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी संमेलनाचा भव्य समारोप होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत,भरत गोगावले
आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
रात्री ९ वाजता लोकसंस्कृतीची झलक दाखवणारा……
‘फोक अख्यान’ हा कार्यक्रम संमेलनाची सांगता अधिक अविस्मरणीय होणार आहे.