
सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने अंकुश गोरे युवा मंच यांच्या वतीने या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत गादी व माती गटासह महिला महाराष्ट्र केसरी आणि ग्रीको-रोमन महाराष्ट्र कुस्ती प्रकारासाठी चुरशीच्या लढती रंगल्या. या निवड चाचणीचा थरार कुस्तीप्रेमींनी मोठ्या उत्साहात अनुभवला. औंध येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठीच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीत वरिष्ठ अजिंक्यपद गादी गटात पृथ्वीराज पाटील यांनी शानदार कामगिरी करत बाजी मारली आहे. तर हजारमाचीची ‘गोल्डन गर्ल’ वेदांतिका पवार हिने महिला महाराष्ट्र केसरीसाठी सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाची कार्यकारिणी बैठक जिल्हाध्यक्ष बापू लोखंडे आणि सचिव धनाजी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सदस्यपदी संदीप भोंडवे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
जिल्ह्यात कुस्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी आगामी काळात जिल्हाभर स्पर्धात्मक कुस्ती मैदाने आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीस तांत्रिक समिती प्रमुख प्रा. अमोल साठे यांच्यासह सर्व पंच संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी महिला महाराष्ट्र केसरीसाठी ५० किलो निवड झालेले मल्ल पुढीलप्रमाणे: अनुष्का हस्पे, ५२ किलो राज नंदिनी रो किलो साक्षी मोरे, ५९ किलो कशिश रणवरे, ५५ किलो योगिता सरक, ५७ मर शेख, ६२ किलो साक्षी पाटील, ६८ किलो दिल्या पोळ, महिला महाराष्ट्र महाराष्ट्र केसरीसाठी ५५ किलो जर्पत केसरी वेदांतिका पवार.
वरिष्ठ अजिक्यपद गादी विभाग (फ्रिस्टाईल) :-
आकाश माने, ८६ किलो संदेश शिपुगले, ९२ किलो प्रथमेश माने, ९७किलो श्रीधर गोडसे, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, वरिष्ठ गट माती विभागातून ५७ किलो देवराज मोहिते, ६१ किलो गोरख कोळेकर, ६५ किलो विशाल रूपनवर, ७० किलो इंजमाम पटेल, ७४ किलो तेजस गोफणे, ७९ किलो राहुल कोरडे, ८६ किलो विशाल कोकरे, ९२ किलो अजिज सय्यद, ९७किलो मंगेश माने, महाराष्ट्र केसरी तुषार ठोंबरे यांची निवड झाली आहे.