
साताऱ्यात सत्तासंघर्ष पेटला ! राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपवर दबाव टाकल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र भाजपकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेना – राष्ट्रवादीने आता नवा पर्याय स्वीकारला आहे.
आता राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे साताऱ्यात नव्या राजकीय युतीची चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केले :-
भाजप आमच्या सदस्यांवर दबाव टाकत असून दोन सदस्यांना आपल्या गोटात ओढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच काही सदस्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या सर्व घडामोडींमुळे साताऱ्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी काळात सत्तासमीकरण आणखी बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.