
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपुर्व पावसामुळे संगममाहुली येथील कृष्णा वेण्णा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. येथील नदीपात्रात असलेली छत्रपती शाहू महाराज यांची समाधी पाण्याखाली गेली आहे. तर काशी विश्वेश्वर मंदिराच्या घाटातील पायऱ्यांपर्यंत पाणी पोहचले आहे. नजीक असलेल्या कैलास स्मशानभूमी तील अग्नी कुंड देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात 157 मिलिमीटर तेवढ्या पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जुन, जुलै महिन्यात धोम, कण्हेर धरणातून पाणी सोडल्यानंतर नदीपात्रातील पाण्यात वाढ होते. पण यंदा मे महिन्यातच पडलेल्या पावसामुळे संगममाहुली येथील कृष्णा वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.