पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त भाजपा सातारा कार्यालयात जीवनपट चित्र प्रदर्शनाचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त भाजपा सातारा कार्यालयात जीवनपट चित्र प्रदर्शनाचे आयोजनभारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा आणि वैद्यकीय आघाडीच्या संयुक्त विद्यमाने भाजपा सातारा जिल्हा कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य वारसा विचार घेऊन काम करणाऱ्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, समाज सेविका डॉ. अरुणाताई बर्गे, मनिषाताई पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हुंडाविरोधी कडक कायदे केले. विधवांना मुले दत्तक घेण्याचे स्वातंत्र्य दिले. महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. महिला मुलांसाठी विशेष संरक्षण कायदे केले विविध धार्मिक स्थळे उभारली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा संपूर्ण देशात सुरु आहे.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, वारसा आणि विचार घेऊन समाजात काम करणाऱ्या सुमतीताई बाजारे, मिनल गोलविलकर, सुवर्णा जाधव, शुभांगी यादव यांचा सत्कार करण्यात आला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हुंडाविरोधी कडक कायदे केले. विधवांना मुले दत्तक घेण्याचे 1स्वातंत्र्य दिले. महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. महिला मुलांसाठी विशेष संरक्षण कायदे केले विविध धार्मिक स्थळे उभारली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा संपूर्ण देशात सुरु आहे.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, वारसा आणि विचार घेऊन समाजात काम करणाऱ्या सुमतीताई बाजारे, मिनल गोलविलकर, सुवर्णा जाधव, शुभांगी यादव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तेजस जमदाडे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र घड्याळे, सागर जाधव, विश्वनाथ कांबळे, डॉ. सुवर्णा फडतरे, रिना भणगे महिला शहराध्यक्षा, निता यादव, कल्पनाताई जाधव, रोहिणी क्षीरसागर, आशा जाधव, कामगार मोर्चाचे पदाधिकारी श्रीकांत कुंभार, धनाजी मोहिते, किरण जाधव, श्रवण मवारे, निनाद प्रभुणे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा कार्यालयात त्यांचा जीवनपट चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून दाखविण्यात आला. तसेच यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटाची माहिती देणाऱ्या जाहिरातीचे अनावरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *