
जावली तालुक्यातील सावरी येथे मेफेड्रॉनचा साठा सापडल्याची घटना ताजी असतानाच, जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ पाचगणी येथे कोकेन तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पाचगणी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत.मुंबईतील १० जणांच्या टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीचा कोकेनसदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत दोन चारचाकी वाहने, मोबाईल हँडसेट व इतर साहित्यांसह एकूण ४२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.घोडजाई मंदिर परिसरात कोकेन विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पहाटे सापळा रचून स्कोडा रॅपिड आणि एमजी हेक्टर या वाहनांची तपासणी करण्यात आली, त्यामधून कोकेन आढळून आले.
पर्यटननगरी पाचगणीला ड्रग्जचा डंख लागल्याने हॉटेल्स व बारवर कडक तपासणीची गरज निर्माण झाली आहे.या प्रकरणात मोहम्मद नावेद सलीम परमार,सोहेल हशद खान,मोहम्मद ओएस रिजवान अन्सारी, वासिल हमीद खान, मोहम्मद साहिल अन्सारी, जिशान इरफान शेख,सैफ अली कुरेशी,मोहम्मद उबेद सिद्दीकी,अली अजगर सादिक राजकोटवाला आणि रहीद मुख्तार शेख (सर्व रा. मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.अटक केलेले सर्व संशयित मुंबईतील रहिवासी असूनत्यांच्याविरोधात पाचगणी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, संशयित पाचगणीत कोणाला कोकेन विकण्यासाठी आले होते? खरेदीदार कोण आहे? आणि कधीपासून हा अवैध व्यवसाय सुरू होता? याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. यातील मोहम्मद परमार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पाचगणीत कोणाला कोकेन विकण्यासाठी आले होते? खरेदीदार कोण आहे? आणि कधीपासून पाचगणीत ड्रग्जची वारी सुरू होती? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ पाचगणी येथे कोकेन तस्करीचा पर्दाफाश!
मुंबईतील १० जणांच्या टोळीला अटक करत
👉 ५ लाखांचे कोकेनसदृश अमली पदार्थ
👉 दोन चारचाकी वाहनांसह
👉 एकूण ४२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळालाही आता ड्रग्जचा डंख लागल्याने, पाचगणीतील हॉटेल्स, बार आणि पर्यटनस्थळांवर कडक तपासणीची गरज निर्माण झाली आहे. पाचगणी पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.