आंधळी मेळाव्यात शेखर गोरे यांनी ZP निवडणुक उमेदवारी जाहीर..

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी आंधळी गटात घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात महत्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी येणाऱ्या आंधळी गटाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची पत्नी सोनल गोरे यांची कमळ चिन्हावरून उमेदवारी जाहीर केले आहे… यावेळी त्यांनी जिल्हा परिषद गटातून सोनल गोरे कमल चिन्हावर निवडून येणार आणि यापुढील काळात भाजपचा आमदार मीच होणार.. असे जाहीर केले असून मी आमदार झाल्यावर मंत्री जयकुमार गोरे यांचा गट वेगळा असेल आणि शेखर भाऊ गोरे यांचा गट वेगळा असेल असे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केल्यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्या समोर बंधू शेखर गोरे यांचे मोठे आव्हान असणार आहे.

यावेळी शेखर गोरे काय म्हणाले,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्यामुळे म्हसवड नगरपालिकेसाठी दिलेल्या उमेदवारांची उमेदवारी माघारी घेतली…कमळाच्या चिन्हावर उमेदवार लढवण्याची मुख्यमंत्र्यांनी विनंती केली होती.. मात्र कमळ चिन्हावर आमची तयारी नसल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे माघार घेतली.. आंधळी गटामध्ये चर्चा सुरू शेखर गोरे यांच्या घरातील सदस्य जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभा राहणार आणि शेवटच्या क्षणी माघार घेणार.. आज मी माझ्या बायकोची आंधळी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर करतो… ते सुद्धा कमळ चिन्हावर.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांनी शेखर भाऊ गटात प्रवेश केला आहे त्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. भविष्यात माझी बायको जिल्हा परिषद गटात कमळ चिन्हावर निवडून येईल आणि शेखर भाऊ सुद्धा कमळ चिन्हावरच आमदार होणार…

”मी भविष्यात भाजपचा आमदार झालो तरी शेखर भाऊ गट वेगळा असणार आणि मंत्री जयकुमार गोरे यांचा गट वेगळा असणार…” मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत जमले तर ठीक…. नाहीतर ग्रामपंचायत आणि सोसायटी सुद्धा शेखर भाऊ गटाची असेल

जोपर्यंत जयकुमार गोरे आणि मी एकत्र बसून चर्चा करत नाही तोपर्यंत या माण तालुक्यातील उमेदवारी जाहीर होणार नाही.

शेखर गोरे ज्यांच्या सोबत राहिला त्यांच्या अंगावर गुलाल पडला. 2014 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत होतो त्यावेळी ते निवडून आले. 2019 मध्ये रणजीत निंबाळकर यांच्या सोबत होतो. त्यांना सुद्धा गुलाल मिळाला. 2024 ला खासदारकीला आपण धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत होतो. त्यांना सुद्धा गुलाल मिळाला. आणि आता 2024 मध्ये जयकुमार गोरे यांच्या सोबत राहिलो त्यांना सुद्धा गुलाल मिळाला.

याचाच अर्थ आम्ही ज्यांचा सोबत असतो तिथेच गुलाल असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *