
फलटण येथे झालेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरपालिका निवडणूक विजयी उमेदवारांच्या आभार मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळ्याव्यात जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंना म्हणाले, “पुन्हा एकदा, शकुनी मामा म्हणत काय होता..”तू काय झाला तू…असा कसा शकुनी मामा बरबाद झाला तू… “अशी खोचक टीका केली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर देखील टीका केली आहे. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना इशारा दिला आहे.हात फिरवत कोणतरी या ठिकाणी आलं आणि इथे दहशत शिवसेनेत चालत नाही असं बोलले होते .त्यांना मला सांगायचे आहे. याआधी देखील कोरेगावचे आले उत्तरचे आले आणि आता फलटणचे पण दहशत आम्हाला चालत नाही. आम्हाला पण दाढी आहे असं सांगत आमच्या नादाला लागायचे नाही असा इशारा देखील जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
दरम्यान माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी देखील रामराजेंवर निशाणा साधत त्यांच्यावर झालेल्या आरोपांविषयी टीका केलीये.“माझी घाणेरडी प्रतिमा तयार करताना देखील फलटण माझ्यासोबत राहिले. आणि ज्या मास्टर माईंड ने हे सगळं केलं त्या मास्टरमाईंडला तुम्ही पुण्याला पाठवण्याचं काम केलं अशी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
यामुळे फलटणमधील विजयी आभार मेळाव्यातील वक्तव्यांमुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापल्याचं चित्र आपलेल्या दिसून येत आहे .आगामी काळात या वक्तव्यांचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.