
देशाचे विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे याचे औचित्य साधून व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी दूरदृष्टीने राबविलेली ‘‘लाडकी बहिण योजना” हा फक्त महिलांचा आर्थिक आधार नाही तर ते समस्त महिलांच्या आत्मविश्वासाचे, आत्मसन्मानाचे प्रतिक बनले आहे. अशा या महनीय व्यक्तींच्या प्रती कृतज्ञतेची भावना व महिलांचा सन्मान करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा माने – कदम, ‘दोन तास समाजासाठी महिला ग्रुप’ यांच्यावतीने शुक्रवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता रहिमतपूर येथील मुक्ताई मंगल कार्यालयात ‘महिला कौतुक सोहळयाचे’ आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजकांनी दिली.
या कार्यक्रमासाठी माहिती तंत्रज्ञान व महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार , खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले , महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे, कराड दक्षिणचे आमदार, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, सौ. चित्रलेखा माने – कदम यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. महिला मेळाव्यात ‘होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा ‘ कार्यक्रम रंगणार आहे.
‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात प्रथम क्रमांकासाठी पैठणीसह इतर सर्व विजेत्या महिलांना असंख्य आकर्षक बक्षीसे देऊन गौरविण्यात येणार आहे. दरम्यान आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा, मजेदार खेळ कार्यक्रमात महिलांना अनेक आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. पु .ना. गाडगीळ अँड सन्स यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभणार आहे. हा कार्यक्रम समस्त महिलांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ रहिमतपूर व रहिमतपूर पंचक्रोशीतील महिलांनी, युवतींना घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.