सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक: मंत्री मकरंद पाटील

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करण्यात येईल असे मत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आ.मकरंद आबा पाटील यांनी व्यक्त केले. सह्याद्री व्याघ्र पीडित प्रकल्पग्रस्तांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट घेतली यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणी बाबत मंत्री महोदयांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे समक्ष चर्चा केली. चर्चा करत असताना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याशी व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर स्थित कराडचे उपसंचालक किरण जगताप यांचेशी देखील फोन करून चर्चा केली.यावेळी मंत्री मकरंद पाटील यांनी व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणी समजून घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री महोदय यांनी लवकरच आपण मंत्रालय स्तरावर वनमंत्री गणेश नाईक यांचे समवेत बैठक आयोजित करणार असून या बैठकीला सातारा जिल्हाधिकारी तसेच ठाणे जिल्हाधिकारी व दोन्ही जिल्ह्यातील संबंधित प्रकल्पग्रस्तांचे वनविभागाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. जावली तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी,खिरखंडी,कुसापूर,तांबी,वासोटा, मालदेव या गावांचे कोअर क्षेत्रात असल्याने दहा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये पुनर्वसन झाले .मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना आवश्यक असणाऱ्या १८ नागरि सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत.तसेच दहा वर्षात त्या ठिकाणी त्यांचे जमीन व घरांचे असलेले प्रश्न आजही शिल्लक आहेत अस या लोकांच्या भेटी अंती लक्षात आलं आहे.त्यांचे प्रश्न मी स्वतः व जिल्हाधिकाऱ्यांनी समजून घेतले आहेत.त्यामुळे लवकरच या व्याघ्र प्रकलग्रस्तांच्या असलेल्या प्रश्नावर वनमंत्री मंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात येईल व त्या बैठकीमध्ये आमच्या सन्माननीय व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे जे काही प्रश्न आहेत ते पूर्णपणे सोडवण्याची भूमिका त्या बैठकीमध्ये मांडण्यात येईल तसेच सर्व व्याघ्र प्रकल्पग्रस्तांना सातारा जिल्ह्यातच पुनश्च पुनर्वसन हवे आहे यावर बोलताना ते म्हणाले की तो निर्णय या ठिकाणी माझ्या स्तरावर होणारा नसून या प्रश्नावर देखील त्यावेळच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात येईल. यावेळी आकल्पे सरपंच संतोष आखाडे,किसन सकपाळ,रामचंद्र जाधव,अशोक मुसळे,भाऊ संकपाळ,आनंद ढवळे,बाळू जाधव,तानाजी संकपाळ यांचेसह ठाणे सातारा येथील बहुसंख्य व्याघ्र प्रकल्प ग्रस्त सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *