
सातारा – कोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथील तलाठी रणजित अर्जुन घाटेराव (वय ३२, रा. अहिरे कॉलनी, सातारा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दि. ९ सप्टेंबर रोजी रंगेहात पकडले.टकले (ता. कोरेगाव) येथील गट क्रमांक १०० मधील ९० गुंठ े शेती वारसा नोंदणीसाठी घाटेराव यांनी २ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने आधीच १ हजार रुपये दिले होते. उर्वरित १ हजार रुपयांची मागणी सुरूच असल्याने तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली.त्यानुसार, पडताळणी करून सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान तलाठी रणजित घाटेराव यांनी उर्वरित १ हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली. त्याचवेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले. घाटेराव विरुद्ध रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पो. हवा. नितीन गोगावले, पो. हवा. निलेश राजपुरे, पो. कॉ. सत्यम थोरात व अजयराज देशमुख यांनी केली.परीवेक्षण अधिकारी – पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे हे होते तर मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पुणे परिक्षेत्र व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांचे लाभले.